📍 बारामती
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी नेहमीप्रमाणे भल्या पहाटे पाच वाजताच विकासकामांची पाहणी सुरू केली. विविध विकासकामांचा आढावा घेत असताना एका ठिकाणी स्ट्रीट फूडसाठी उभारण्यात आलेल्या शॉप्सची त्यांनी पाहणी केली.
यावेळी तेथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या चहाच्या दुकानाची माहिती घेत असताना संबंधित व्यावसायिकाने कडाक्याच्या थंडीत चहा घेण्याचा आग्रह केला. व्यावसायिकांच्या आग्रहाला मान देत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चहाचा आस्वाद घेतला.
चहा घेत असताना दादांनी उपस्थितांशी संवाद साधत दुधाच्या व्यवसायासंदर्भात चर्चा केली. दूध उत्पादक, व्यावसायिक आणि स्थानिक उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजनांबाबतही त्यांनी विचारमंथन केले. या प्रसंगी दादांचा साधेपणा आणि सर्वसामान्य व्यावसायिकांशी असलेला थेट संवाद पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

