पुणे:शाळेतील स्नेहसंमेलन हा एक सांस्कृतिक कार्यक्रम असून विद्यार्थ्यांना कलाविष्कार सादर करण्यास एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होते असे प्रतिपादन डॉ काशिनाथ बांगर यांनी व्यक्त केले.
या वर्षी शाळेने विविधतेतील एकता या संकल्पनेच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक व बदलणाऱ्या अनेक स्थानांचे दर्शन घडवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. तसेच विविधता व धार्मिक दृष्ट्या भिन्न असूनही एकत्र राहण्याची आणि एक राष्ट्र म्हणून येण्याची भावना या संकल्पनेच्या आधारे जागृत झाली.
प्रा. फुलचंद चाटे यांनी स्नेहसंमेलनापासून शिस्त हा गुणवत्तेचा मूलभूत पाया आहे. तसेच आजच्या काळात विद्यार्थ्यांना गुण व संस्कार मिळवण्यासाठी गुरुकुल पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेची गरज आहे असे सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, रमेश बापू कोंडे, सरपंच राकेश गाडे, तसेच उद्योजक हिरामण पांगारे आणि शाळेचे प्राचार्य नामदेव माने, व शाळा समन्वयक प्रा. प्रवीण जावळे, विष्णू पालवे, सचिन तांबडे तसेच स्कूलचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसमेलनातून विद्यार्थ्यांच्या जीवनमूल्यांचा विकास.,,,, डॉ. काशिनाथ बांगर.
Date:

