पुणे- सत्ताधाऱ्यांकडून पाच ते सात लाख रुपये घेऊन PMPML मध्ये भरती होत असल्याचा आरोप करत आचार संहिता भंगाची तक्रार कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी दिलेले पत्र खाली वाचा जसेच्या तसे….
मा. आयुक्त पुणे महानगरपालिका शिवाजीनगर, पुणे
जा.क्र. :
दिनांकदि. २७ डिसेंबर २०२५
विषयः आदर्श निवडणूक आचारसंहिता भंग केल्याबद्दल पी. एम. पी. एम. एल. या संस्थेच्या प्रशासनावर कारवाई होणे बाबत.
महोदय,
पीएमपीएमएल या कंपनीचे पदसिद्ध संचालक म्हणून आपण पुणे मनपाचे आयुक्त या नात्याने कार्यरत आहात सद्य स्थितीत प्रशासक नेमणूक असल्याने सर्व धोरणात्मक निर्णय, कामकाज वरिष्ठ अधिकारी पाहत आहेत. ज्यात आपलाही समावेश आहे. पीएमपीएमएल कंपनीने सद्यस्थितीत निवडणूक आचारसंहिता भंग करणारे दोन आक्षपार्ह निर्णय घेतले आहेत जे या लेखी पत्राद्वारे आपल्या निदर्शनास आणत आहोत.
१) पीएमपीएमएल कंपनीमध्ये सध्या छुप्या व गैरपद्धतीने सेवक निवड नियमावलीचा भंग करत लेखनिक भरती सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, काही एजंट हे प्रति लेखनिक पद नियुक्ती चे पाच ते सात लाख रुपये गैरपद्धतीने बेरोजगार तरुणांकडून उकळत आहेत. सदर भरती प्रक्रियेमध्ये कोणतीही लेखी अथवा तोंडी परीक्षा घेतली जात नसून मोठ्या प्रमाणे आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे सदर बाब पी एम पी एम एल चे प्रशासन व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्या आर्थिक व्यवहारातून घडत आहे. सदर बेकायदेशीर नोकर भरतीला काँग्रेस पक्षाचा तीव्र आक्षेप आहे.
२) प्रशासक काळात दूरगामी आर्थिक परिणाम होणारे कोणतेही निर्णय अथवा टेंडर प्रक्रिया राबवू नये असे संकेत आहेत. पी एम पी एम एल प्रशासनाने कोणत्याही आवश्यक परवानग्या न घेता १०० बसेस खरेदीचे निविदा टेंडर मागवलेले निर्देशित होत आहे. अवघ्या वीस ते पंचवीस दिवसात मनपाची मुख्य सभा अस्तित्वात येणार असताना सदर प्रकरणी होत असलेली घाईगडबड ही अनाकलीय संशयास्पद आहे.
वरील दोन्ही प्रकरणे ही आदर्श निवडणूक आचारसंहितेचा उल्लंघन करणारी आहेत. सदर प्रकरणी मोठ्या प्रमाणावर प्रश्नपत्रिकेने आर्थिक निधी गोळा करून तो निधी निवडणूक कार्यात गैरव्यवहारासाठी वापरला जाऊ शकतो तरी सदर प्रकरणी पीएमपीएल प्रशासना विरुद्ध आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार या पत्राद्वारे आपल्या कडे करीत आहोत. या लेखी तक्रारी मध्ये नमूद केलेले दोन्ही विषय तातडीने स्थगित करण्यात यावे व संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करून न्यायालयीन दाद मागितली जाईल.
27/12/2025 01.12.8M
आपला
अरविंद शिंदे अध्यक्ष
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
Reais
महापालिका आयुक्त कार्यालय
प्रत,
पुणे महानगरपालिका
१) मा. उपायुक्त, निवडणुक कामकाज आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष,
आपत्ती व्यवस्थापन विभाग, २ रा मजला, पुणे मनपा.


