मनसे शिवसेना युती,माविआत नाही,पण पुण्यात बैठकीला शिवसेना नेते,कार्यकर्ते कनफ्युज…

Date:

पुणे- मनसे आणि शिवसेना युती झाली,दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि भाजपच्या सामन्यासाठी बाह्या सरसावल्या पण हि लढाई लढताना महाविकास आघाडीत असलेल्या शरद पवार गटाने या युती बरोबर राहण्याचा मुंबईत निर्णय देखील जाहीर केला.कॉंग्रेसने भाजपा ला विरोध म्हणून ठाकरे बंधूंचे स्वागत केले असले तरी त्यांनी मविआ मध्ये त्यांच्या सोबत नसल्याचे सांगितल्याने महाविकास आघाडीचा पोपट तर गायबच झाला. मग पुण्यात कॉंग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी श.प यांची बैठक कशी झाली ? हा प्रश्न उपस्थित करत कार्यकर्ते कनफ्युज…झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान मनसे चे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी म्हटले आहे कि,’ मनसे शिवसेनेची युती महाराष्ट्रा साठी झाली आहे.यात मुंबईत काँग्रेसचा समावेश नाही राष्ट्रवादी (शरद पवार) हा पक्ष मुंबईत किंवा पुण्यात बरोबर येण्या साठी सकारात्मक आहे.त्याची बोलणी उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत सुरू आहे मात्र अशी परिस्थिती काँग्रेस सोबत नाही असे असताना पुण्यात काँग्रेस बरोबर आघाडीत जावे का प्रश्न मनसे समोर आहे. हा प्रश्न असल्या मुळे काल झालेल्या बैठकीत मनसे सहभागी झाली नाही.मुळात एका शहरात विरोधात लढणाऱ्या पक्षाशी दुसऱ्या शहरात आघाडी करणे जनतेच्या पचनी पडेल का याचा विचार शिवसेनेने केला पाहिजे “आघाडी असेल तर ती सर्व महाराष्ट्रासाठी असेल” तर ते योग्य होईल. याबाबत आम्ही आज दुपारी चर्चा करून माध्यमांना योग्य ती माहिती पुरवू असेही ते म्हणाले.

दरम्यान कॉंग्रेसच्या एका नेत्याने असे म्हटले आहे कि,या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी श.प हा पक्षच अस्तित्वात राहणार नाही असा अनेकांचा अंदाज आहे त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य आणि तत्वावर ठाम राहिलेल्या कॉंग्रेसला आता स्वतंत्रपणे लढण्याशिवाय मार्गच उरलेला नाही.जे निवडून येतील त्या बळावर कॉंग्रेस लढतच राहील. सत्तेत यायलाच हवे असे काही या पक्षाचे नाही, विरोधात बसूनही हा पक्ष आपली ठाम भूमिका कणखर पणे मांडत राहील.


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय...

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता;पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे, दि. १० फेब्रुवारी...

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर वाडेकर,सभागृहनेते बिडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित...

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश ना....