पुणे- काल रात्री उशिरापर्यंत हॉटेल शांताई मध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश बागवे यांनी पुढाकार घेऊन अजितदादांच्या घरून माघारी परतलेल्या शरद पवार गटाला पुन्हा तिकडे जाऊ नका असा सल्ला देत त्यांच्यापुढे सन्मानाने ५० जागांचा प्रस्ताव ठेवला ज्या त्यांनी भाजपला मदत होईल अशा पद्धतीने न लढता जिंकून येऊ अशाच पद्धतीने लढाव्यात आणि विजयानंतर महापालिकेच्या राजकारणात महाविकास आघाडितच बसावे अशा शर्तीही घातल्याचे वृत्त आहे.दरम्यान या वृत्तानुसार ५० जागा कॉंग्रेस लढवेल, ५० जागा शिवसेना ठाकरे गट लढवेल आणि उर्वरित १५ जागा वंचित आणि सोबत येणाऱ्या समविचारी पक्षांना द्याव्यात असा प्रस्ताव देखील कॉंग्रेस नेते बागवे यांनी या बैठकीत ठेवला आहे. ज्यास सर्वानुमते अनुमती मिळाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
शरद पवार गटाच्या नेत्यांचे वागणे दुटप्पी आहे.सत्तेसाठी त्यांनी भाजपच्या ताटातील वाटी बनलेल्या अजितदादांच्या गटात सामावून नगरसेवक पदे मिळविण्याचे आणि सत्तेत प्रवेश करण्याचे प्रयत्न केले.त्यासाठी त्यांनी आपल्याच शहर अध्यक्षाचा बळी देखील घेतला. त्यामुळे त्यांना पुन्हा महाविकास आघाडीत घेताना जपून,अभ्यासून घ्यावे असा सूर कार्यकर्त्यांचा आहे.पण सुबह का भूला शाम को घर आ जाए तो उसे भूला नहीं कहते हैं,या तत्वाने मोठे मन दाखवून सन्मानाने त्यांना समावून घेण्याचा पवित्र कॉंग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी यावेळी घेतल्याचे सांगण्यात येते.या बैठकीला कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे,अभय छाजेड,शिवसेनेचे संजय मोरे, वसंत मोरे,गजानन थरकुडे हे उपस्थित होते असे सांगण्यात आले. प्रशांत जगताप या बैठकीला उपस्थित नव्हते.मात्र त्यांनी हडपसर मधून आपल्या मातोश्री तसेच मोहसीन शेख यांच्यासह ५ जागा लढविण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे.
शरद पवार (Sharad Pawar) पक्षाच्या वतीने शुक्रवारी अंकुश काकडे, बापू पठारे, प्रकाश म्हस्के आणि विशाल तांबे यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पुणे अध्यक्षांची भेट घेतली. मात्र या चर्चेतून काही समोर आलेलं नाही. उलट ही युती फिस्कटली याला अजित पवारांनी केलेल्या मागणीचं कारण दिलं जात आहे.त्यानंतर पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची हि तातडीची बैठक पार पडली.

