पुणे-बाणेर: भारतातील सर्वात विश्वसनीय आणि अग्रगण्य ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज पुणे, महाराष्ट्र येथील बाणेर मेन रोडवरील गणराज चौक येथे आपल्या नवीन शोरूमचा शुभारंभ केला. सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. या भागातील ब्रँडची उपस्थिती अधिक मजबूत करणे हे या शोरूमचे उद्दिष्ट आहे. या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सची एकापेक्षा एक सरस उत्कृष्ट डिझाइन्स उपलब्ध आहेत, जसे की, मुहूर्त (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकला केलेले अँटिक दागिने), निमा (मंदिर शैलीतील दागिने) इत्यादी अनेक लोकप्रिय इन–हाऊस ब्रँड्स याठिकाणी उपलब्ध आहेत.
शाही थाट आणि डिझाइन्सचा खजिना असलेले हे बाणेरमधील नवे कल्याण ज्वेलर्स स्टोर खरेदीचा अतुलनीय अनुभव प्रदान करेल.
यावेळी अभिनेत्री सोनाली बेंद्रे म्हणाल्या, “कल्याण ज्वेलर्सच्या या नवीन दालनाचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक–निष्ठेला महत्त्व देणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी एक सन्मान आहे. मला खात्री आहे की, इथले दर्जेदार दागिने आणि उत्कृष्ट सेवा ग्राहकांच्या मनाला नक्कीच भुरळ घालतील!”
नवीन शोरूमच्या उदघाटनाबद्दल बोलताना कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरामन म्हणाले, “बाणेरमध्ये हे नवे कल्याण ज्वेलर्स स्टोर, ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे, दागिन्यांच्या खरेदीचे एक परिपूर्ण केंद्र ठरावे अशी आमची इच्छा आहे. जागतिक दर्जाच्या वातावरणात आणि सेवेतून एक उन्नत अनुभव देण्याची आमची वचनबद्धता कायम आहे, आणि तरीही आम्ही कल्याण ज्वेलर्सच्या विश्वास व पारदर्शकतेच्या चिरंतन मूल्यांशी घट्ट जोडलेले आहोत.”
या नवीन शुभारंभाच्या निमित्ताने, कल्याण ज्वेलर्सने स्टोअरमध्ये अनेक खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. साध्या सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर (Value Addition) प्रति ग्रॅम ७५० रुपये फ्लॅट सवलत, प्रीमियम आणि जडाव (Studded) दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम १५०० रुपये फ्लॅट सवलत, तर टेम्पल आणि अँटिक दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम १००० रुपये फ्लॅट सवलत देण्यात येत आहे. याशिवाय, ‘कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट‘ देखील लागू असेल, जो बाजारपेठेतील सर्वात कमी दर असून सर्व शोरूम्समध्ये एकसमान आहे. हे सर्व फायदे केवळ मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहेत.
कल्याण ज्वेलर्समधील प्रत्येक दागिना हा ‘बीआयएस‘ (BIS) हॉलमार्क असलेला असून त्यावर शुद्धतेच्या विविध चाचण्या केल्या जातात. याव्यतिरिक्त, ग्राहकांना ब्रँडचे सिग्नेचर ‘४–स्तरीय आश्वासन प्रमाणपत्र‘ (4-Level Assurance Certificate) मिळते, जे सोन्याची शुद्धता, दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल (Free lifetime maintenance), उत्पादनाची सविस्तर माहिती आणि पारदर्शक एक्सचेंज व बाय–बॅक धोरणांची हमी देते.
या शोरूममध्ये कल्याणचे लोकप्रिय ‘हाऊस ब्रँड्स‘ देखील उपलब्ध असतील, ज्यात मुहूर्त (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकला केलेले अँटिक दागिने), निमा (मंदिर शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअरसारखे हिऱ्यांचे दागिने), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी हिरे), अंतरा (लग्नासाठीचे हिऱ्यांचे दागिने), हेरा (अगदी रोज वापरता येतील असे हिऱ्यांचे दागिने), रंग (मौल्यवान खड्यांचे दागिने) आणि अलीकडेच लाँच केलेले लीला (रंगीत खडे आणि हिऱ्यांचे दागिने) या कलेक्शन्सचा समावेश असेल.

