पुणे-पुणे महापालिका निवडणूक प्रमुख अधिकारी,उपायुक्त प्रसाद काटकर यांनी कळविले आहे कि,’राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, यांचे आदेशानुसार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. सदर १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून दि. २३.१२.२०२५ व दि.२४.१२.२०२५रोजी एकूण ६४३७ इतके तर आज दि. २६.१२.२०२५ रोजी एकूण २६६४ नामनिर्देशन फॉर्मची विक्री करण्यात आली आहे.
नामनिर्देशन फॉर्मची आज दि. २६.१२.२०२५ रोजी सर्वात जास्त विक्री निवडणूक निर्णय अधिकारी, कोथरूड बावधन कार्यालय, पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे. तथापि सर्वात कमी विक्री निवडणूक निर्णय अधिकारी, कसबा विश्रामबागवाडा कार्यालय, पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी, येरवडा कळस धानोरी कार्यालय –२२९; निवडणूक निर्णय अधिकारी, नगर रोड -वडगाव शेरी कार्यालय –९६; निवडणूक निर्णय अधिकारी, कोथरूड बावधन कार्यालय –५६७; निवडणूक निर्णय अधिकारी, औंध बाणेर कार्यालय –१४०; निवडणूक निर्णय अधिकारी, शिवाजीनगर घोले रोड कार्यालय –१६६; निवडणूक निर्णय अधिकारी, कै बा स ढोले पाटील रोड कार्यालय –११०; निवडणूक निर्णय अधिकारी, हडपसर मुंढवा कार्यालय –१७६; निवडणूक निर्णय अधिकारी, वानवडी रामटेकडी कार्यालय –१६४; निवडणूक निर्णय अधिकारी, बिबवेवाडी कार्यालय –१६७; निवडणूक निर्णय अधिकारी, भवानी पेठ कार्यालय –२२३; निवडणूक निर्णय अधिकारी, कसबा विश्रामबागवाडा कार्यालय –८७; निवडणूक निर्णय अधिकारी, वारजे कर्वेनगर कार्यालय –१७४; निवडणूक निर्णय अधिकारी, सिंहगड रोड कार्यालय –१२२; निवडणूक निर्णय अधिकारी, धनकवडी सहकारनगर कार्यालय –१३८; निवडणूक निर्णय अधिकारी, कोंढवा येवलेवाडी कार्यालय –१०५ या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून आज दि. २६/१२/२०२५ रोजी या प्रमाणे विक्री करण्यात आलेली आहे. उमेदवाराकडून आज निवडणूक निर्णय अधिकारी, बिबवेवाडी कार्यालयांतर्गत ३, वारजे कर्वेनगर कार्यालयांतर्गत २, कै बा स ढोले पाटील रोड कार्यालयांतर्गत १,नगर रोड वडगाव शेरी कार्यालयांतर्गत १, कोथरूड बावधन कार्यालयांतर्गत १ असे एकूण ८ (आठ) नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आलेली असून
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करणेसाठी पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये विविध आचारसंहिता पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. जेणेकरून निवडणूक प्रक्रिया मुक्त, पारदर्शी आणि निर्भयपणे पार पाडण्यास मदत होणार आहे.
आज २६६४ नामनिर्देशन फॉर्मची विक्री, उमेदवारी अर्ज आले आठ
Date:

