जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा, शरद पोंक्षेंनी दिला हिंदुत्वाचा नारा

Date:

पुणे- हिंदूंचे कमीत कमी नुकसान करणाऱ्यांना मत द्या, असे आवाहन शरद पोंक्षे यांनी केले आहे. तसेच मत देताना सामाजिक हिताचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी गांधी परिवारावरही जोरदार निशाणा साधला आहे. कल्याण येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात शरद पोंक्षे बोलत होते.महानगरपालिकांच्या निवडणुका काही ठिकाणी महायुती एकत्र लढणार आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर. महाविकास आघाडीतही जागावाटपावर चर्चा सुरू असून मुंबईत ठाकरे बंधूंनी युती केली आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांसह कलाकारही सहभागी होताना दिसत आहेत. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

शरद पोंक्षे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीतील निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, लोकशाही राज्यामध्ये आपल्या हिंदूंना दोन प्रकारच्या लढाया लढायच्या आहेत. पहिली लढाई ही निवडणुकीच्या मैदानात बटन दाबून जिंकायची आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा, हे वाक्य मनात कोरून ठेवायचे आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी गांधी परिवारावर टीका केली. ते म्हणाले, तीन माणसांचे घर ज्याला चालवता येत नाही, त्यांनी 140 कोटींचा देश चालवणाऱ्याला शिकवू नये, असा घणाघात पोंक्षे यांनी केला.

पुढे बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, हलालच्या वस्तू वापरू नका. जाळीच्या टोपीवाल्यांकडून काहीही खरेदी करू नका. दोन्ही लढाई आपल्याला गुप्तपणे लढायच्या आहेत. संविधानाने दिलेल्या अधिकारात आपल्याला गुप्तपणे लढाई लढायची आहे. हिंदू राष्ट्र तयार करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना नेमकी कुठली लढाई जिंकायची आहे, ते मी तुम्हाला सांगितले आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बनावट आधारकार्डद्वारे बोगस मतदान, 6 जणांवर गुन्हा:तिघांचे झाले मतदान, तर तिघांच्या तपासणीत फुटले बिंग

पुणे-पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध...