विद्याभारती महाविद्यालयाच्या ‘लगीन’ने पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीला सुरुवात

Date:

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला आज (दि. २६ ) विद्याभारती महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘लगीन’ या एकांकिकेने सुरुवात झाली. स्पर्धा भरत नाट्य मंदिर येथे होत आहे.

पुण्यासह रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि कोल्हापूर केंद्रांवर झालेल्या स्पर्धेतील बक्षीसप्राप्त एकांकिकांचे अंतिम फेरीत सादरीकरण होत आहे.  

आज (दि. २६) सकाळच्या सत्रात सादर झालेल्या एकांकिका :  लगीन (विद्याभारती महाविद्यालय, अमरावती), सोयरिक (आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, नागठाणे), स्वधर्म (श्री ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती). सायंकाळच्या सत्रात सादर झालेल्या एकांकिका : काही प्रॉब्लेम ये का (अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर), वामन आख्यान (मॉडर्न कला-विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेशखिंड),

शनिवार, दि. २७ रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. प्रथम सत्रात सादर होणाऱ्या एकांकिका : अस्तित्व (संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), अर्बन (प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च, बडनेरा), ग्वाही (दे. भ. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर), खोडाला फांदीचा आधार (देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर), सायंकाळ सत्रात सादर होणाऱ्या एकांकिका : जाळ्यातील खिळे (मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी), ठोंग्या (फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी), गोष्टीचा खेळ (वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर), बुजगावणं (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर).

रविवारी (दि. २८) सकाळ सत्रात सादर होणाऱ्या एकांकिका : तुकारामाची टोपी (फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी), वयाचं गणित (सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, छत्रपती संभाजीनगर), जिव्हाळा (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर), आतल्या गाठी (सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे – स्वायत्त).

रविवारी (दि. २८) सायंकाळी ४ वाजता भरत नाट्य मंदिर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘अभिनय : हौस आणि व्यवसाय’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इंटरॅशनल थिएटर अकॅडमीचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद वनारसे आणि सोनी पिक्चर्सचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अमित फाळके मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यशाळा आणि कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा - भाऊसाहेब...

तेलंगणा मधील महात्मा फुले पुतळा विटंबनेचा पुण्यात निषेध

माळी महासंघ पुणे शहराच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन ;...