उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

Date:

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर

मुंबई | दि. २५ डिसेंबर २०२५ : आगामी महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेने आपली निवडणूक रणनिती अधिक मजबूत करत पक्षाच्या ‘स्टार प्रचारकां’ची अधिकृत यादी जाहीर केली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या यादीत राज्य व केंद्रातील मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते, युवासेना व विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांचा समावेश असून, शिवसेनेची संघटनात्मक ताकद, अनुभव आणि नेतृत्वाचा प्रभाव याचे प्रतिबिंब या निवडीतून स्पष्टपणे दिसून येते.

‘स्टार प्रचारक’ यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, दादाजी भुसे, संजय राठोड, भरत गोगावले यांच्यासह अनेक ज्येष्ठ व युवा नेत्यांचा समावेश आहे. तसेच महिला नेत्या, अल्पसंख्याक विभाग, युवासेना आणि आध्यात्मिक सेनेचे प्रतिनिधी यांनाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

शिवसेना ही केवळ निवडणूक लढवणारा पक्ष नसून जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारी, विकासाभिमुख आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची वाहक शक्ती आहे, हा संदेश या प्रचारक यादीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी जनतेसमोर जाणार असल्याचे या घोषणेतून स्पष्ट होते.
या ‘स्टार प्रचारकां’च्या माध्यमातून शिवसेनेची विकासाची भूमिका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारची कामगिरी आणि जनतेशी असलेली थेट नाळ प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा निर्धार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय...

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता;पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे, दि. १० फेब्रुवारी...

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर वाडेकर,सभागृहनेते बिडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित...

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश ना....