तर भाजपाचीही काँग्रेससारखी दयनीय अवस्था होईल
हिंदुत्वाची उपेक्षा कराल, तर हिंदुत्ववादी पुणेकर जागा दाखवतील
दहशतवादमुक्त पुण्यासाठी भाजपाची उमेदवार यादी मुस्लिममुक्त हवी
समस्त हिंदू आघाडीतर्फे आयोजित हिंदुत्व जागृती सभेत ‘ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा’चा संकल्प
पुणे: हिंदुत्वाशी बेईमानी करून सत्तेच्या लालसेपोटी मुस्लिमांचे लाड करणे थांबवा. हिंदू बांधवांवर, हिंदुत्वावर, गोवंशावर वारंवार हल्ले करणाऱ्या, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शक्तींच्या गळ्यात गळे घालून उमेदवारी देण्याचे प्रयत्न दुर्दैवी आहेत. हिंदुत्ववादी पक्ष म्हणवणाऱ्या भारतीय जनता पार्टीतील काही नेतेमंडळी हिंदुत्वाची उपेक्षा करीत आहेत. गुन्हेगारांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे असेच चालत राहिले, तर भविष्यात भाजपाचीही अवस्था काँग्रेससारखीच दयनीय होईल. अशा लोकांना पुण्यातील हिंदुत्ववादी समाज जागा दाखवून देईल, असा इशारा हिंदुत्व जागृती सभेत देण्यात आला. दहशतवादमुक्त, शांत व सुरक्षित पुण्यासाठी भाजपाची उमेदवारी यादी मुस्लिममुक्त असायला हवी, असा आग्रहही या सभेत धरण्यात आला.
हिंदुत्ववादी पक्षांनी हिंदुत्वाची उपेक्षा थांबवावी, या मागणीसाठी ‘ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा’ या मोहिमेसाठी हिंदुत्व जागृती सभेचे आयोजन केले होते. समस्त हिंदू आघाडीच्या वतीने शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कुलमध्ये आयोजित सभेला हभप संग्रामबापू भंडारे, क्रांतिकारी देशभक्त समीर कुलकर्णी आणि मिलिंदभाऊ एकबोटे यांनी संबोधित केले. हजारोंच्या संख्येने सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदूत्ववादी पक्षांकडून अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाच्या धोरणावर तीनही वक्त्यांनी सडकून टीका केली.
मिलिंद एकबोटे म्हणाले, “पुण्यात भगव्याची, हिंदुत्वाची उपेक्षा सुरु आहे. भाजपचे नेते गुंडाना पोसण्याचे काम करत आहेत. हिंदू बांधवांवर हल्ले करणाऱ्या मुस्लिमांना उमेदवारी मिळण्यासाठी आग्रह करीत आहेत. हे चित्र अतिशय दुर्दैवी असून, धर्मासाठी, देशासाठी व पक्षासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या प्रामाणिक नेत्यांवर अन्याय होत आहे. या देशाच्या, धर्माच्या रक्षणासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. मात्र, आज हिंदूंकडूनच मुस्लिमांचे लांगुलचालन सुरु आहे.एवढेच नाही, तर या विशिष्ट राजकीय धोरणामुळे पुण्यातील सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत आहे. दिल्लीतील कार स्फोटाचे संबंध कोंढव्यातील अतिरेक्यांपर्यंत पोहचतात आणि कोंढव्यातील अतिरेकी प्रवृत्तीचा विस्तार शहरभर झाला आहे, ही गंभीर बाब आहे.”
“गेल्या अनेक वर्षात भाजपने कमावलेली पुण्याई वाया घालवण्याचे काम स्थानिक शीर्ष नेतृत्व करीत आहे. हज हाऊस बांधण्यासाठी आग्रही असणारेच आज पुन्हा मुस्लिमाना उमेदवारी देण्यात आघाडीवर आहेत. आज हिंदुत्वाच्या जीवावर मंत्रीपद, आमदारकी मिळवणाऱ्या याच लोकांनी आणलेला हज हाऊसचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्याप्रमाणे या निवडणुकीत हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना व पक्षाला जागा दाखवून देऊ. मग तो पक्ष भाजप असो की शिवसेना, आपल्याला फक्त ‘ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा’ हा वेदमंत्र अमलात आणायचा आहे. येणाऱ्या निवडणुकीत हिंदू उमेदवारालाच मतदान करून हिंदुत्व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा,” असे आवाहनही मिलिंद एकबोटे यांनी केले.

हभप संग्रामबापू भंडारे म्हणाले, “हिंदू सहिष्णू आहे. सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाणारा धर्म आहे. मात्र, यावर सातत्याने आघात होत आहेत. आपण शांतपणे हे पाहत बसायचे का? आपल्यातील हिंदुत्व जागृत ठेवण्याची गरज आहे. बांगलादेश, न्यूझीलंडमधील हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना संतापजनक आहेत. हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या अशा शक्तींना राजकीय स्वार्थापोटी काही पक्ष आणि नेतेमंडळी पाठीशी घालत आहेत. त्यांना तिकीट देऊन सत्तेत सहभागी करून घेत आहेत. येणाऱ्या काळात हा मोठा धोका असून, हिंदुत्वावर हल्ले करणाऱ्यांना प्रोत्साहन देणारे प्रकार आहेत. हे वेळीच थांबणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्यातील प्रत्येक हिंदू पेटून उठला पाहिजे. भाजपने सर्वांसाठी दार खुले केले असून, गुंड प्रवृत्तींनाही राजरोसपणे प्रवेश दिले जात आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. हे असेच सुरु राहिले, तर काँग्रेसचे जसे अधःपतन झाले, तसे भाजपचे व्हायला वेळ लागणार नाही. हिंदूंनी आपली शक्ती एकवटली, तर या लोकांचे राजकीय अस्तित्व धोक्यात यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे कोणतीही मिंधेगिरी न करता स्पष्टपणे यांना जाब विचारण्याची धमक आपण ठेवली पाहिजे. यापुढे प्रत्येक नेत्याला कपाळी टिळा आहे का, हे विचारले पाहिजे. नसेल तर त्यांना मतदान टाळून घरी बसवले पाहिजे.”
समीर कुलकर्णी म्हणाले, “हिंदुत्वाशी पंगा घेणाऱ्यांना तोंड दाखवायलाही जागा राहत नाही, हे आजच्या काँग्रेसच्या परिस्थितीवरून दिसून येते. हिंदूंची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांचे फावले आहे. यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हिंदुत्वाची ताकद एकवटली पाहिजे. देव, धर्म आणि देश हाच आपल्या जगण्याचा पाया आहे. परिवर्तन घडवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. त्यामुळे जिहाद्यांना खांद्यावर घेऊन मिरवण्याचे प्रकार बंद व्हावेत. आचार आणि विचार यामध्ये अंतर असता कामा नये. मात्र, आज हिंदुत्वाचा विचार घेऊन राजकारण करणाऱ्यांचे आचरण पाहिले, तर संताप यावा, अशी स्थिती आहे. हिंदू बांधव आणि हिंदुत्वाच्या विचारांवर चालणाऱ्या मतदारांमुळे आपल्या हाती सत्ता मिळाली, याचा विसर सत्ताधाऱ्यांनी पडू देऊ नये.”

