पुणे:नोएडा (उत्तर प्रदेश) येथे दिनांक ४ ते १० जानेवारी, २०२६ दरम्यान होणाऱ्या ९व्या वरिष्ठ महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ निवडण्याकरिता जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, पुणे येथे महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन मार्फत निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या महासचिव भरतकुमार व्हावळ व शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव या द्विसदस्य निवड समितीने या चाचणीतून जाहीर केलेला महाराष्ट्र वरिष्ठ महिला बॉक्सिंग संघ पुढीलप्रमाणे:-
४५-४८ किलो: नितू सुतार (पिंपरी चिंचवड शहर)
४८-५१ किलो: हर्षदा लोहाट (पुणे शहर)
५१-५४ किलो: प्रगती पाटील (सांगली जिल्हा)
५४-५७ किलो: अनिता औजी (पुणे शहर)
५७-६० किलो: प्राजक्ता शिंदे (धुळे जिल्हा)
६०-६५ किलो: पुजा पाटील (कोल्हापूर शहर)
६५-७० किलो: श्रुति सोनवणे (जळगाव जिल्हा)
७०-७५ किलो: सायली अहिरे,(नाशिक जिल्हा)
७५-८० किलो: सई डावखर (पुणे शहर)
या खेळाडूंना महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे व्यवस्थापकीय सचिव महेश सकपाळ, रेफरी जज कमिशन चेअरमन एकनाथ चव्हाण, सचिव अभिमान सुर्यवंशी, कोचेस कमिशन चेअरमन विजय गुजर, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मेमजादे, सुरेशकुमार गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या.
या निवड चाचणी मध्ये सनी परदेशी, आसिफ शेख, मनोज यादव, चेतना वारे, प्रदीप वाघे, आदी पंचांनी प्रमुख भूमिका बजावली.

