शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे गटाच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जल्लोषात प्रवेश
पुणे दि.२४: सोलापूर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील महिलांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा संघटिका अमिता जगदाळे यांच्यासह अनेक प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी आज पुण्यातील सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यात लोकसभा संघटिका मंगल मोरे, सोलापूर उत्तर संघटिका भारती मुनोळी, उपजिल्हा संघटिका ललिता झळके, शहर संघटिका सोनाली भोसले, विधानसभा संघटिका दीपाली पवार, उपशहर संघटिका नागू कनमुशे यांच्यासह इतर महिला पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. हा प्रवेश जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. यावेळी, कामगार सेना प्रदेशाध्यक्ष सुधीर कुरूमकर, युवासेना सचिव किरण साळी, पुणे शहर सचिव संदीप शिंदे आदी उपस्थित होते.
शिंदे गटाच्या वाढत्या ताकदीला आणि विकासाच्या कामांना प्राधान्य देत या महिला शिवसैनिकांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे. या प्रवेशामुळे सोलापूरातील शिवसेनेची ताकद आणखी वाढली असून, उद्धव गटाला मात्र मोठा फटका बसला आहे.

