पुणे : शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सहज पोहोचावा या हेतूने माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्राला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत या केंद्राच्या माध्यमातून तब्बल २७ हजार नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळाल्या आहेत.असा दावा बिडकर यांचे समर्थक विशाल दरेकर यांनी केला आहे. ते म्हणाले,’ जनसंपर्क अभियानादरम्यान लाभ मिळाल्या नागरिकांना हा सुविधा पुरवण्याचे विशेष प्रशिक्षण ‘टीम बिडकर’ला देण्यात आले आहे.सोमवार व रास्ता पेठ परिसरात सुरू असलेल्या या केंद्रांमधून उत्पन्न, रहिवासी व जातीचे दाखले, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ई-श्रम कार्ड, शहरी गरीब कार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहेत. ‘टीम बिडकर’च्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांमुळे ही प्रक्रिया जलद व सुलभ झाली आहे.
आतापर्यंत ७ हजार दाखले, ४,१७४ आधार कार्ड, ४ हजार शहरी गरीब कार्ड, ४,४२९ मतदार ओळखपत्रे आणि १,८०० ई-श्रम कार्ड वितरित करण्यात आले आहेत. एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि फेऱ्या वाचत आहेत. प्रशासन व नागरिक यांच्यातील प्रभावी दुवा म्हणून महा ई-सेवा केंद्र काम करत आहे.असेही त्यांनी म्हटले आहे.

