पुणे : 1 जानेवारी 2026 रोजी मौजे पेरणे येथे होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या लक्षावधी अनुयायांना सुरक्षितता पुरविण्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार तसेच महाराष्ट्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांचे सह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. यावेळी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून येणाऱ्या प्रश्नांविषयी त्यांनी आयोजक व स्थानिकांशी चर्चा देखील केली.
“ यंदाचा उत्सव निर्विघ्नपणे तसेच कोणत्याही तणावाशिवाय पार पडणार असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता एक जानेवारी रोजी अभिवादनासाठी यावे असे आवाहन यावेळी आयुक्तांकडून करण्यात आले.
यावेळी पुणे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ , अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील , पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल , पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, संदिप भाजीभीकरे , हिंम्मतराव जाधव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

