मुंबई- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील एका हॉटेलात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करून BMC निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या राजकीय खात्म्याचा निर्धार व्यक्त करत मुंबईतील मराठी माणसांना एकत्र येण्याचे आवाहन केले.दरम्यान, मुंबईसह राज्यभरातील ठाकरे घराण्याच्या चाहत्यांची राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची इच्छा होती. आज ही त्यांची इच्छा राजकीयदृष्ट्या पूर्ण झाली.मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असा विश्वासही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकीपूर्वी जागा वाटप झालेलं आहे. निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे, ज्यांचा मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा.
राज ठाकरे म्हणाले, आम्ही आमची भूमिका जाहीर सभांतून मांडूच. परंतु, मागे एक मुलाखत झाली होती. मी मुद्दामहून आठवण करून देतो त्या गोष्टींची… त्यात मी असे म्हणालो होतो की, कोणत्याही वादापेक्षा व भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. मला असे वाटते की, या एका वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळवणाऱ्या खूप टोळ्या फिरत आहेत. त्यात दोन टोळ्यांची भर पडली आहे. त्या राजकीय पक्षांमधील मुले पळवतात.
जे निवडणुका लढवणार आहेत, त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची केव्हा भरायची आपल्याला कळवले जाईल. आज फक्त आपल्यापुढे मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की, महाराष्ट्र बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टीची प्रतिक्षा करत होता ती शिवसेना व मनसेची युती झाली हे आज आम्ही जाहीर करत आहोत.
उद्धव ठाकरे म्हणाले, संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश काही सत्यनारायणाच्या पुजेसाठी आणला नव्हता. त्यामागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. 107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला निवडून दिली. त्याची आज आठवण होणे स्वाभाविक आहे. आम्ही आज दोघेही इथे बसलेलो आहोत. आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यातील पहिल्या 5 सेनापतींपैकी एक सेनापती होते.
त्यांच्यासोबत माझे वडील शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज यांचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांत ठाकरे म्हणजे अख्खे ठाकरे घराणे त्यावेळी मुंबईसाठी संघर्ष करत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसांच्या उरावर उपरे नाचायला लागले. त्यावेळी न्याय हक्कांसाठी शिवसेनाप्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. पुढच्या वर्षी शिवसेनेला 60 वर्षे होतील. इतकी वर्षे व्यवस्थित केली. आज आपण परत आपण पाहत आहोत की, मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळी ज्यांना मुंबई हवी होती, त्यांचेच 2 प्रतिनिधीच आज दिल्लीत बसलेत त्यांचे मनसुबे आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, आत्ता आपण भांडत राहिलो तर मग तो जो काही संघर्ष, ते जे काही हुतात्मा स्मारक आहे, त्याचा मोठा अपमान होईल. आज आमचे कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. मी मागेच सांगितले होते की, एकत्र आलोत, ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबई व महाराष्ट्रावर कुणीही वाकड्या नजरेने किंवा कपटी कारस्थानाने मुंबईला महाराष्ट्रापासून किंवा महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचे काम प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत. उत्साह अमाप आहे.
ठाकरे बंधू आणि पत्रकारांचे प्रश्न उत्तरे
पत्रकार: उद्धव सर, ही युती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का? कारण अनेक ठिकाणी असं होऊ शकतं स्थानिक पातळीवरती…
उद्धव ठाकरे: अजून बाकीच्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा, कालपर्यंत युती झालेली नसेल, नाशिकमध्ये झालेली आहे. बाकीच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्यासुद्धा तिथल्या युतीवर आज उद्या शिक्कामोर्तब होईल.
पत्रकार: सर मराठवाडामध्ये काय असणार आहे? रावसाहेब दानवे असं म्हणतात की ही उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल, या इलेक्शननंतर त्यांच्याकडे कार्यकर्तेच राहणार नाहीत…
उद्धव ठाकरे: त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते? त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोणी विचारत नाही.
पत्रकार: उद्धवजी, उद्धवजी…
उद्धव ठाकरे: मला असं वाटतं की उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाही.
पत्रकार: उद्धवजी मराठवाडामध्ये, उद्धवजी उद्धवजी सर…
उद्धव ठाकरे: मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच.
पत्रकार: पण भाजप म्हणतेय की यामुळे मुस्लिम मतांचे राजकारण…
उद्धव ठाकरे: मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ‘अल्ला हू अकबर’ असं बोललेले आहेत ते, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत ना…
पत्रकार: लावणार का? पुन्हा व्हिडिओ लावणार का? व्हिडिओ पुन्हा लावणार का?
उद्धव ठाकरे: ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार आहेत.
पत्रकार: उद्धवजी, ‘बटेंगे तो कटेंगे’ उत्तर भारतीयांसाठी, यावर काय म्हणाल?
उद्धव ठाकरे: काय म्हणायचं? सगळ्यावर कसं बोलायचं?
पत्रकार: उद्धवजी महाविकास आघाडीच काय? महाविकास आघाडीबाबत काय?
उद्धव ठाकरे: मला असं वाटतं आज मुंबईचं आम्ही तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जश्या जश्या होतील तश्या तुम्हाला सांगू.
पत्रकार: साहेब मुंबईच्या युतीत राष्ट्रवादी पवार साहेब आहेत का? पक्ष सोडून गेलेल्यांना परत प्रवेश देणार का? मनसे किंवा शिवसेनेमधून जे पदाधिकारी कार्यकर्ते बाहेर गेलेत त्यांना आता युती झाल्यानंतर परत…
राज ठाकरे: येऊ तर देत पहिलं.
पत्रकार: साहेब या युतीत पवार साहेब आहेत का? हा एकनाथ शिंदे… उद्धवजी पवार साहेबांसोबत तुमचं काही बोलणं झालंय का मुंबई किंवा इतर…
राज ठाकरे: उद्धववरती खूप असतं सगळं.
पत्रकार: साहेब या युतीत पवार साहेब आहेत का? उद्धवजी ठाकरे बंधूंची युती होत असताना महाविकास आघाडी विस्कटलेली आहे. काँग्रेस स्वबळावर लढतेय आणि जे भाजपला हवंय तेच होताना दिसतंय, कारण परप्रांतीय आणि मुस्लिम मतं कदाचित तुमच्यापासून…
उद्धव ठाकरे: भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो. चर्चा सुरू आहे, बघू त्यांच्याशी पण चर्चा चालू आहे. आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
पत्रकार: या युतीमध्ये आणखीन कुठला एखादा पक्ष येणार आहे का?
उद्धव ठाकरे: जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्याच्यात भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे, त्याच्यात काही जण भाजपात सुद्धा आहेत ज्यांना हे जे काही चाललंय ते पाहावत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात.
पत्रकार: उद्धवजी तुम्ही महाविकास आघाडी सोबत आहात का?
उद्धव ठाकरे: काँग्रेसने तर जाहीर केलं ना? मग आता आणखीन काय बोलायचं? जोडलं का तोडलं?
पत्रकार: पण उद्धवजी त्यांनी बाहेर पडण्याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत आल्यामुळे त्यांचे विचार…
उद्धव ठाकरे: बघा मला बाकी कोण काय म्हणतय त्याच्याशी काही कर्तव्य नाही, मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघू.
पत्रकार: तुमचं जागा वाटप… महाविकास आघाडी अबाधित आहे का अजून सुद्धा?
उद्धव ठाकरे: सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहे.
पत्रकार: उद्धवजी, २०१८ साली याच जिमखान्यात एक जागा वाटप झालं होतं… युतीची घोषणा करताना ५०-५० जागा वाटपाचं समीकरण ठरलं होतं. तर आज ठाकरे बंधूंची युती जाहीर होत असताना महानगरपालिकेत सत्ता आली, तर सत्ता वाटपाचं काही सूत्र आहे का?
उद्धव ठाकरे: त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहितीये, तर आता आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत. आता आमचं दोघांचं घर आहे ना, दार बंद कशाला करता?
पत्रकार: जागा वाटप केव्हा जाहीर होईल?
उद्धव ठाकरे: निवडणुकीपूर्वी. अरे झालेलं आहे जागा वाटप. निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे, ज्यांचा मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद.