पुणे-खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांचे नेतृत्व आपण करणार असल्याचे जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.यावेळी त्यांनी माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या भूमिकेवरही भाष्य केले. सुळे म्हणाल्या की, त्यांनी प्रशांत जगताप यांच्याशी सहा तास चर्चा केली आहे. कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे.जगताप यांचा राजीनामा आपल्याकडे आलेला नाही आणि ते टोकाची भूमिका का घेत आहेत, हे माहिती नसल्याचे सुळे यांनी सांगितले. केवळ प्रशांत जगतापच वेगळी भूमिका मांडत असून, पक्षातील इतर कोणीही काही बोलत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पक्षात नाराजी नसते, हा शब्द घरी वापरण्याचा असतो, असे सांगत त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे म्हटले. शरद पवार हे पक्षाचे केंद्रबिंदू असून, ते सांगतील तीच पूर्व दिशा असते, असेही त्यांनी नमूद केले.
प्रशांत जगताप यांची मन की बात काय कुठलीही बात ऐकायची माझी तयारी आहे. ते म्हणतील ते दिशा, ते म्हणतील ते उमेदवार द्यायला तयार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे येणाऱ्या महापालिकेत पुणे मुंबई आणि इतर महापालिकेत पक्षाच नेतृत्व करणार आहेत. मी प्रशांत जगताप यांच्या बरोबर चर्चा केली आहे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. त्यांची मागणी होती की प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. पवार साहेब केंद्र बिंदू म्हणून चालतो. जर पवार साहेब केंद्र बिंदू आहेत, तर त्यांनी जे ठरवतील आम्हाला मान्य असल्याचे सुळे म्हणाल्या.
आज त्यांनी पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या चर्चा केली. या बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत मते जाणून घेतली.कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेण्याचे आवाहन केले असून, पुणे शहराच्या हितासाठी पाण्याचा प्रश्न, वाहतूक समस्या, पर्यावरण आणि वायू प्रदूषण यांसारख्या मुद्द्यांवर अनेक इच्छुक उमेदवारांनी भूमिका मांडल्याचे सुळे यांनी सांगितले.राजकारण हे लोकांची सेवा करण्याचे साधन आहे. आपण पक्षाच्या कार्यकर्त्या असून, शरद पवार जे सांगतील ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी नदीत उडी मारण्यास सांगितले आणि ती भूमिका योग्य असेल तर तेही करेन, असे त्यांनी म्हटले.
मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निवडणुकीसाठी एकत्र आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, माजी महापौर दत्ता धनकावडे यांनी ‘घड्याळ’ चिन्हावर दोन्ही पक्षातील उमेदवार लढतील असे म्हटले असले तरी ते महत्त्वाचे नसल्याचे सुळे यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीत अनेकांनी आपल्या विरोधात काम केले असले तरी, मैत्री आणि राजकारण आपण वेगळे समजतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास मी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी दिला आहे. काल त्यांनी मुंबईत खासदार सुप्रिया सुळे यांची देखील भेट घेतली होती. दरम्यान, याबबत सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशांत जगताप यांचा प्रस्वात माझ्याकडे आला नाही. ते एवढ्या टोकाच्या भूमिका का घेत आहेत? हे मला कळत नसल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. प्रशांत जगताप यांना माझ्या सोबत बसवा मी डिबेट करायला तयार आहे असेही सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी सहा तास चर्चा केली. यामध्ये आम्ही निवडणुकीवर बोललो. सगळे निर्णय पवार साहेब घेतील. एकटे प्रशांत दादा बोलत आहेत बाकी कोणी बोलत नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. इथे बसलेल्या कुणालाही विचारा, आमचा पक्ष आदरणीय पवार साहेब म्हणतील तसेच चालतो असे सुळे म्हगणाल्या.
आज पक्षाच्या बैठका झाल्या आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांच्या एक सुरात सूचना केली आहे. मनमोकळेपणे बोलावं यासाठी प्रक्रिया आहेत. प्रत्येकाने ठरवलं आहे शरद पवार ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. लवकरात लवकर निर्णय घ्या अस सांगितलं आहे. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. पर्यावरण आणि वायू प्रदूषण या बद्दल सांगितलं आहे. अनेक वर्ष जे काम बोलत आले आहेत ते केल पाहिजे असे सुळे म्हणाल्या.

