पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे विरोधक पटापट भाजपामध्ये जमा होत असताना आता विरोधक कोणी उरला कि नाही ? असे विचारावे लागेल अशी स्थिती असताना दुसरीकडे आज महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाचे उपायुक्त यांनी सांगितले कि,’. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. सदर १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून आज दि. २३.१२.२०२५ रोजी एकूण २८८६ नामनिर्देशन फॉर्मची विक्री करण्यात आलेली आहे.
नामनिर्देशन फॉर्मची सर्वात जास्त विक्री निवडणूक निर्णय अधिकारी, कसबा विश्रामबागवाडा, पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे. तथापि सर्वात कमी विक्री निवडणूक निर्णय अधिकारी, कोंढवा येवलेवाडी, पुणे महानगरपालिका यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी, येरवडा कळस धानोरी कार्यालय – १९५; निवडणूक निर्णय अधिकारी, नगर रोड -वडगाव शेरी कार्यालय – १९५; निवडणूक निर्णय अधिकारी, कोथरूड बावधन कार्यालय – १९४; निवडणूक निर्णय अधिकारी, औंध बाणेर कार्यालय – ७३; निवडणूक निर्णय अधिकारी, शिवाजीनगर घोले रोड कार्यालय – २७५; निवडणूक निर्णय अधिकारी, कै बा स ढोले पाटील रोड कार्यालय – १७५; निवडणूक निर्णय अधिकारी, हडपसर मुंढवा कार्यालय – १९९; निवडणूक निर्णय अधिकारी, वानवडी रामटेकडी कार्यालय – १९९; निवडणूक निर्णय अधिकारी, बिबवेवाडी कार्यालय – २२१; निवडणूक निर्णय अधिकारी, भवानी पेठ कार्यालय – १९१; निवडणूक निर्णय अधिकारी, कसबा विश्रामबाग वाडा कार्यालय – ३००; निवडणूक निर्णय अधिकारी, वारजे कर्वेनगर कार्यालय – २२१; निवडणूक निर्णय अधिकारी, सिंहगड रोड कार्यालय – १९७; निवडणूक निर्णय अधिकारी, धनकवडी सहकारनगर कार्यालय – २००; निवडणूक निर्णय अधिकारी, कोंढवा येवलेवाडी कार्यालय – ५१ या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून आज दि. २३/१२/२०२५ रोजी या प्रमाणे विक्री करण्यात आलेली असून आज कोणत्याही निवडणूक अधिकारी कार्यालयात कोणत्याही उमेदवाराकडून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आलेली नाहीत.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करणेसाठी पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये विविध आचारसंहिता पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. जेणेकरून निवडणूक प्रक्रिया मुक्त, पारदर्शी आणि निर्भयपणे पार पाडण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाचे उपायुक्त यांनी हि माहिती प्रसिद्धीस दिली आहे.
पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज
Date:

