मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५
बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६, घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या डॉ. अर्चना संजय भालेराव यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. दादर येथील वसंत स्मृती भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश भाजपा मुंबई अध्यक्ष आणि आमदार मान. श्री अमीत साटम यांच्या उपस्थितीत २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पार पडला.
यावेळी बोलताना श्री. अमीत साटम म्हणाले, “आता मुंबईमध्ये पूर्वीची शिवसेना राहिली नाही. त्यांनी आता हिंदुत्व पूर्णतः सोडून दिलेलं आहे. यांचा रंग बदलला आहे. आता भगवा यांचा रंग राहिलेला नाही. त्याची नीती बदलली आहे आणि आता त्यांना मुंबईला पाकिस्तान करायचं आहे. मुंबईमध्ये महापौर यांना खान करायचा आहे. त्यामुळे या सगळ्याला कंटाळून यांचे शिवसैनिक त्यांची साथ सोडून मुंबईच्या विकासाला साथ देताना दिसत आहेत.”
दरम्यान या पक्ष प्रवेशाच्या वेळी श्री. मनोज कोटक, आमदार श्री. राम कदम, मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्री. राजेश शिरवडकर, सौ. श्वेता परुळकर हे उपस्थित होते.

