पुणे – रा.स्व. संघाच्या सहकारनगर भागातील अरण्येश्वर प्रभात शाखेतर्फे घेण्यात येणा-या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या हिवाळी क्रीडा स्पर्धांचा गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी शुभारंभ होणार आहे. या स्पर्धांमध्ये सुमारे सुमारे ५० स्वयंसेवक सहभागी होतील. स्पर्धांसाठी सध्या जोषात सराव सुरु आहे. दि.२५ ते ३१ डिसेंबर या दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना झेपतील अशा धावणे, भरभर चालणे, उलटे चालणे, बॉल लांब फेकणे, दंडाची भालाफेक , बॉलने टार्गेट उडविणे, रिंग , बॉल उंच फेकणे अशा अगदी सोप्या प्रकारात या स्पर्धा होणार आहेत. कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला या स्पर्धेत सहभागी होता येईल.
स्पर्धांचा शुभारंभ गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी राष्ट्रीय हॉकीपटू आणि निवृत्त पोलिस अधीक्षक कैलास पिंगळे यांच्या हस्ते होणार आहे. तर दि. ३१ रोजी बॉक्सिंग मधील नॅशनल चॅंपियन आर्या कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.
सहकारनगर परिसरातील स्त्री – पुरुष नागरिकांनी शुभारंभ व पारितोषिक वितरणाच्या दिवशी उपस्थित रहावे असे आवाहन शाखेचे कार्यवाह नितीन करंबेळकर यांनी केले आहे.
स्पर्धा अरण्येश्वर संघस्थान, सहकारनगर येथे सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत होतील. दि. ३१ रोजी पारितोषिक वितरणही त्याच ठिकाणी होणार आहे.
अरण्येश्वर प्रभात शाखेच्या क्रीडा स्पर्धांचा गुरुवारी शुभारंभ
Date:

