पुणे;
पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे ‘सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमास सर्वधर्मीय राजकीय, सामाजिक कला व क्रीडा क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते. सेक्रेड हार्ट धर्मग्रामाचे प्रमुख फादर मायकल यांनी आयोजनामध्ये मोठा सहभाग घेतला. बिशप थॉमस डाबरे यांनी ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी ख्रिश्चन रिजनल सोसायटीचे अध्यक्ष व ख्रिश्चन समाजाचे नेते लुकस (प्रशांत) केदारी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. ‘धार्मिक सलोखा’ वाढावा यासाठी या कार्याक्रमांचे आयोजन केल्याचे सांगून ख्रिश्चन समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी महानगरपालिका विधानमंडळ यामध्ये प्रतिनिधित्त्व मिळण्यासाठी आपण सर्व बांधवांनी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी भाई विवेक चव्हाण यांनी आंबेडकरी चळवळीच्या वतीने ख्रिश्चन समाजाला शुभेच्छा दिल्या. प्रवीण वाळिंबे यांनी स्नेह मेळावा हा अत्यंत कौतुकास्पद कार्यक्रम आहे जो सर्व जाती धर्मांना जोडतो आणि एकात्मता आणि प्रेम निर्माण करतो असे सांगितले. प्रत्येक भारतीय माणसाने त्याच्या विविधतेचा, संस्कृतीचा भाग झालं पाहिजे आणि प्रत्येक जाती-धर्माच्या सणावारात सहभागी झालं पाहिजे असे संदीप बर्वे यांनी सांगितले. नीलिमा पंडित यांनी संविधानातील मूलभूत हक्कांचा उल्लेख केला. बास्तु रेगे यांनी सामाजिक न्याय हक्कासाठी आम्ही सर्व जाती-धर्माच्या बांधवांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत असे सांगितले. नितीन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या वतीने नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. अल्पसंख्याक समाज ख्रिश्चन बांधवांच्या मागे ठामपणे उभा आहे असे अॅड. मोहसीन यांनी सांगितले. याप्रसंगी सुधाकर सदाफळ यांचेही भाषण झाले.संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान सॅम्युअल साखरे व वाद्य वृंद यांनी ख्रिसमस सणाचे गायन सादर केले. नितीन भोसले यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन बघितले.
याप्रसंगी अन्वर पठाण, अॅड. नानासाहेब नलावडे, सौ. श्रद्धा मनोज शेट्टी, उमेश चव्हाण, मुकेश कानडे, प्रोफ. जय आनंद, सी.ए. विठ्ठल शिंदे, किरण केदारी, किशोर कांबळे, अॅड. अंतोन कदम, जॉन मंतोडे, जॉन फर्नांडिस, अॅड. लुईस तेलोरे, रवींद्र कांबळे, युजीन अलेक्स, शौल कांबळे, फेबियणं सॅमसन, विनोद तोरणे, अभिजीत साळवे, अविनाश भाकरे, नरेश चव्हाण, मेरी पारगे, सुलभा कांबळे, प्रतिमा केदारी, महेश अवताडे, बाळासाहेब चोखर, अंतोन त्रिभुवन, सॅम्युअल जाधव, मधुकर वाघमारे, राजेंद्र चक्रनारायण, सुधीर खरात, मायकल पिल्ले, जॉर्ज रॉड्रिक्स, आदि मान्यवर उपस्थित होते
.

