पुणे
दिनांक: 22 डिसेंबर 2025
पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालविनाऱ्या चालकांविरुद्ध 3 दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली.
दिनांक 19 डिसेंबर 2025 ते 21 डिसेंबर 2025 रोजी दरम्यान 3 दिवस शहरातील विविध भागांमध्ये एकूण 30 ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारून तपासणी करण्यात आली.
या विशेष कारवाईदरम्यान मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या एकूण 201 वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक दंड व पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी कळविली आहे.
पुणे शहर वाहतूक विभाग पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे अपघातांचा धोका वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा.

—

