पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच ग्रामीण भागातील उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण हक्क मंचचे संस्थापक अध्यक्ष मतीनभाई मुजावर यांच्या माध्यमिक शिक्षण विभागातील उर्दू माध्यमाच्या सर्व शाळांना एकत्र करून अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत डॉ. अल्लामा इकबाल उर्दू प्राथमिक शाळा कासारवाडी, आला हजरत इमाम अहमद रजा उर्दू प्राथमिक शाळा नेहरूनगर, उर्दू प्राथमिक शाळा, खराळवाडी, जाधववाडी चिखली येथे तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा उरुळी कांचन, राजगुरुनगर, मंचर येथे अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला
विद्यार्थ्यांमध्ये अल्पसंख्याक हक्क, समानता व सामाजिक सलोखा याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने शाळेत वकृत्त, निबंध व चित्रकला, भित्तीपत्र स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांना चषक (ट्राफी) व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात चांदभाई बळबड्डी यांनी अल्पसंख्याक हक्क दिन आयोजित करण्यामागील उद्देश व अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबत माहिती दिली. तसेच अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्त्व, अल्पसंख्याकांचे हक्क व कर्तव्ये आदींबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, शिक्षण हक्क मंचचे मतीनभाई मुजावर तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उर्दू विभागातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक आदी उपस्थित होते.
0000

