पुणे:
तिरुपती नागरी सहकारी संस्था यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ‘रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट’ ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन २ हजार रक्तदात्यांची उपस्थिती होती.त्यातील १००५ जणांनी रक्तदान केले.५० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेल्या ‘रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट’च्या ४५ सभासदांनी शिबिरात रक्तदान केले.या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
हे शिबिर गाडगे महाराज धर्मशाळा, सोमवार पेठ येथे दि.२१ डिसेंबर २०२५ रोजी हे शिबिर झाले.’रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट ‘चे संस्थापक सदस्य अनिल बिहाणी यांनी त्यांचे १०० वे रक्तदान केले,संस्थापक राम बांगड यांनी १८१ वे तर गिरीश लाहोटी यांनी १५८ वे रक्तदान केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे समाजसेवक डॉ.अभिजीत सोनवणे हे होते.यावेळी तिरुपती नागरी सहकारी संस्थेचे अध्यक्ष जुगल पुंगलिया,धीरज पुंगलिया, गिरीधर काळे,संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
तिरुपती नागरी सहकारी संस्थेचे हे १४ वे रक्तदान शिबीर होते.शिबिरात २ हजार रक्तदात्यांची उपस्थिती होती.त्यातील १००५ जणांनी रक्तदान केले.या शिबिरात १४ रक्तपेढ्यांनी रक्त संकलित केले.”पुण्यात असलेला रक्तदानाचा तुटवडा काही दिवस तरी नक्कीच दूर होण्यास मोठी मदत होईल. रक्तदात्यांना अशा प्रकारे प्रोत्साहन देणारे उपक्रम वारंवार होणे गरजेचे आहे,”असे राम बांगड यांनी सांगितले.

