पुणे- शिवसेनेचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार,शिवसेनेच्या निवडणूक कार्यालयीन कामकाज यासाठी शिवसेना पक्षाच्या प्रभारी राज्य निवडणूक समन्वयक पदी (कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्र विभाग) पुण्यातील युवा नेते वैभव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे याशिवाय शिवसेना पक्षाच्या धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता राज्य कक्ष प्रमुख पदी देखील वैभव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हि नियुक्ती देखील एक वर्षासाठी असणार आहे . पुण्यातील चळवळीतील कार्यकर्त्यांना तात्काळ जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे शिवसनेने स्पष्ट केले आहे.
पुण्याचे वैभव वाघ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रभारी राज्य निवडणूक समन्वयक पदी…
Date:

