महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा !
कोरेगाव पार्क : पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ अशी घोषणा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी येथे केली.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोरेगाव पार्क येथे भारतीय जनता पार्टीच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, बुथ प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक संपन्न झाली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीसंदर्भात संबोधित केले. पुणे कॅन्टोन्मेंटचे लोकप्रिय आमदार सुनील कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित केली.
भाजपा-महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी संघटितपणे काम करत पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी मोहोळ यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण अरडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील रजपूत, सूर्यकांत निकाळजे या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला.
बैठकीस माजी मंत्री दिलीप कांबळे, गणेश बिडकर, सुशांत निगडे, शशिधर पूरम, मनिषाताई लडकत, स्मिता खेडकर, चेतन चाकोर, . मुन्नवर खान, समीर शेंडकर, आशिष जानजोत, बाबा बिडकर, अमित व्होरा, अजिंक्य वाळेकर, आशिष सुर्वे, श्रीकांत मंत्री यांच्यासह पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

