पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

Date:

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगराध्यक्ष निवडून आलेत. तर शिंदे गटाला 4, तर भाजपला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकही जागा महाविकास आघाडीला जिंकता आली नाहीय. नगराध्यक्षपदासाठी ११९ उमेदवार रिंगणात होते .यामुळे पुणे जिल्ह्यावर अजित पवारांचीच जादू असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. लोणावळ्यात राष्ट्रवादीचे राजेंद्र सोनवणे, दौंडमध्ये दुर्गादेवी जगदाळे, शिरूर येते ऐश्वर्या पाचरणे, इंदापुरात भरत शाह, जेजुरीत जयदीप बारभाई, भोरमध्ये रामचंद्र आवारे, बारामतीत सचिन सातव, फुरसुंगी येथे संतोष सरोदे व वडगाव मावळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या आंबोली ढोरे विजयी झाल्या.

नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या गटानं मोठं यश मिळवलंय. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानंतर नगराध्यक्षपदाच्या चार जागा शिवसेना शिंदे गटानं तर तीन जागा शिवसेनेनं जिंकल्या आहेत. पुणे जिल्ह्यात अजित पवार यांनी दबदबा कायम राखला आहे.

पुणे जिल्ह्यातील निवडून आलेले नगराध्यक्ष पक्ष

१ बारामती सचिन सातव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

२ लोणावळा राजेंद्र सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

३ तळेगाव संतोष दाभाडे भाजपा महायुती

४ दौंड दुर्गादेवी जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

५ चाकण मनीषा गोरे शिवसेना

६ शिरूर एश्वर्या पाचरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

७ इंदापूर भरत शाह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

८ सासवड आनंदी काकी जगताप,भाजपा

९ जेजुरी जयदीप बारभाई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

१० भोर रामचंद्र आवारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

११ आळंदी प्रशांत कुराडे भाजपा

१२ जुन्नर सुजाता काजळे शिवसेना एकनाथ

१३ राजगुरुनगर मंगेश गुंडा शिवसेना एकनाथ शिंदे

१४ वडगाव मावळ आंबोली ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

१५ मंचर राजश्री गांजले शिवसेना एकनाथ शिंदे

१६ माळेगाव सुयोग सातपुते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट

१७ उरुळी फुरसुंगी संतोष सरोदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय...

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता;पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे, दि. १० फेब्रुवारी...

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर वाडेकर,सभागृहनेते बिडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित...

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश ना....