मुसळधार पावसाने दुबई ची तुंबई….विमानोड्डाणं रद्द…..प्रवाशी अडकले….

Date:

दुबईला गेलेले भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले ….

पुणे- गेली काही दिवसांपासून दुबईला गेलेले पुण्यातील भाजपचे जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते ,प्रवक्ते दुबईत झालेल्या मुसळधार पावसाने विमाने रद्द झाली अन दुबैतच अडकून पडले . त्यांनी व्हाटसअप ग्र्रूप आणि सोशल मिडिया तून याबाबतची आंखो देखी .. मोठ्या सुरेख शब्दात वर्णन करून पुणेकरांपुढे कथित केली आहे. आणि निसर्गाच्या लहरीपणाचे फटके सगळे जगच अनुभवत आहे….ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय रे भाऊ म्हणणाऱ्यांना निसर्गाने दणका दिलाय या शब्दात बदलत्या हवानाचा धोका निदर्शनास आणून देण्याचाही पर्यटन केला आहे.

खर्डेकर यांनी नेमके काय म्हटलेय ते वाचा त्यांच्याच शब्दात ……

गेले 2 दिवस ढगाळ हवामान असलेल्या दुबई काल मुसळधार पावसाने झोडपले… येथे ड्रेनेज व्यवस्था नसल्याने सर्वत्र पाणीच पाणी आणि मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळाली….

काल ( 18 डिसेंबर ) सायंकाळी विमानतळ गाठले…. आमची रात्रौ 11:35 ची flight…. एकापाठोपाठ विमानोड्डाणं रद्द च्या बातम्या धडकत होत्या आणि विमानतळाचे टर्मिनल 2 एस टी स्टँड पेक्षाही जास्त गर्दीने तुडुंब भरले होते…. दुबई हे शांत विमानतळ त्यामुळे इथे उदघोषणा नाहीत, समोर उत्तर द्यायला कोणी अधिकारी ही नाही, सगळा chaos होता….कोणालाच काही कळत नव्हते….

थोड्या वेळाने गोवा, अहमदाबाद, कराची, अंकारा अशी काही विमाने हवेत झेपावली….त्यामुळे आम्हा मुंबई च्या प्रवाश्यांची आशा पल्लवीत झाली… प्रवाश्यांचा पारा चढत होता… जागोजागी वादविवाद आणि आरडाओरडा सुरु होता…..पहाटे 3/3:30 ला Fly Dubai च्या काही अधिकाऱ्यांनी खेकसत चं Mac D किंवा KFC मधून सर्वांना meal देत असल्याची घोषणा केली…. पोटात कावळे ओरडत असल्यामुळे सर्वांनीच पेटपूजा केली आणि तेवढ्यात अधिकाऱ्यांनी मुंबई च्या प्रवाश्यांनी गेट क्रं 11 जवळ लाईनीत उभे रहावे असे सांगितलं…. सर्वांचेच चेहरे फुलले…. मात्र दुर्दैव काही पाठ सोडेना… विमान रद्द झाले असून तुम्हाला आम्ही उद्याचे (19 डिसेंबर चे ) रात्री 11:35 च्या flight चे बोर्डिंग पास देत असून तुम्हाला तोपर्यंत हॉटेल मध्ये ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले….

माझे लोकांना समजावणे, अधिकाऱ्यांशी चर्चा हे समाजकार्य माझ्या अंगाशी आले आणि काही वेळातच 19 च्या रात्रीची flight हॉउसफ़ुल्ल झाली असून माझ्यासह अनेक प्रवाश्यांना 20 तारखेला रात्री 11:35 ला accomodte करू असे सांगण्यात आले…. मग immigration वा इतर सोपस्कार पूर्ण करून एका बऱ्यापैकी हॉटेल मध्ये आम्ही आलोय….

दुष्टचक्र इथेच संपत नाहीये…. आम्हाला बॅग मिळालेल्या नाहीत त्या check in baggage मध्ये आहेत… उद्या रात्री पर्यंत काय कपडे घालावे हा प्रश्न तर दुय्यम आहे पण अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सर्वांचीच आबाळ होते आहे…. रोलबॉल च्या पुरुष आणि महिला गटात केनिया ला पराभूत करून हिंदुस्थान विजयी झाल्याचा आनंद तर विरलाच आहे, पण दोन दिवस करायचे काय हा ही प्रश्न आहे…. अनेकांकडे पुरेसे पैसेही नाहीत…. वर तेथे असलेले अधिकारी अत्यन्त उर्मटपणे वागत होते, त्यांचे वागणे असह्य होत होते व काहीही विचारलं की त्यांचे अधिकारी अंगावर येऊन पोलिसांची धमकी देत होते… परदेशात त्रास नको म्हणून लोकांनी हे सगळे सहन केले…. आता मंत्रालय, fly dubai कंपनी व सर्वत्र फोनाफोनी करत आहे…अनेक विमानांचे उड्डाणं रद्द किंवा नियोजित वेळेपेक्षा खूप उशिराने होत आहे…..

मित्रवर्य नितीन इसरानी यांनी त्वरित दोन दिवस पुरेल येवढा खाऊ धाडलाय आणि कपडे विकत घेऊन पाठवतो म्हणतोय…. तर सौरभ अथणीकर ह्या पुण्यातील स्नेह्याने ( सध्या दुबईत असलेल्या ) पाणी ओसरले तर संध्याकाळी येतो दादा ” चूल मटण ” ला जेवायला जाऊ सांगितलंय… तिकडे माझा जीवलग मित्र राजेंद्र गादिया ची लेक नुपूर चोरडिया म्हणतीये की काका तुम्ही अबुधाबीला माझ्या घरी या आणि flight मिळेपर्यंत इथेच रहा…… सध्या तरी वाईट अडकलोय….. कुठेचं जाता येणे शक्य नाही….निसर्गाच्या लहरीपणाचे फटके सगळे जगच अनुभवत आहे….ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय रे भाऊ म्हणणाऱ्यांना निसर्गाने दणका दिलाय येवढ मात्र खरं…..बघुयात काय होते ते….

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रायफल शूटिंगमध्ये अप्रतिम आशिष ढेंगे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पुणे- इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अप्रतिम आशिष ढेंगे...

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...