सातारा- अमेरिकेतील कुप्रसिद्ध ‘जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडल’ प्रकरणातील गोपनीय फाईल्स उघड होत असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अत्यंत गंभीर आणि खळबळजनक दावा केला आहे. ” च्या ई-मेल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख असून, अमेरिकेतील एका बड्या अधिकाऱ्याची मोदींशी भेट घालून देण्यासाठी एपस्टीनने चक्क मध्यस्थी केली होती,” असा आरोप चव्हाण यांनी केल्याने भारतीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.नरेंद्र मोदींशिवाय या फाईल्समध्ये इतरही भारतीय दिग्गजांची नावे असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. “केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे नाव एका ई-मेलमध्ये आढळले आहे. तसेच एका माजी खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचेही नाव या कागदपत्रांमध्ये आहे. शिवाय अमेरिकेत राहणाऱ्या एका बड्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचाही यात समावेश आहे,” अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेत रिलीज झालेल्या डेटाचा हवाला देत सांगितले की, “उघड झालेल्या माहितीमध्ये काही ई-मेल्स आहेत. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह बॅनन (Steve Bannon) यांनी जेफ्री एपस्टीनला एक मेल केला होता. यात बॅनन यांनी, ‘मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचे आहे,’ अशी विनंती एपस्टीनला केली होती. यावर एपस्टीनने, ‘तुमची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतो,’ असे उत्तर दिले. धक्कादायक बाब म्हणजे, त्यानंतर काही दिवसांनी एपस्टीनने बॅनन यांना पुन्हा मेल करून ‘मोदी भेटायला तयार आहेत,’ (Modi is on Board) असे कळवले.”
या ई-मेल व्यवहारावर बोट ठेवत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले, “मोदींचा संदर्भ हा 2014 चा आहे. जेफ्री एपस्टीन हा बाल लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी होता. तो देह व्यापर करतो हे माहिती असतना त्यांच्याशी संपर्का का? अशा व्यक्तीचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नक्की नाते काय? एका सेक्स स्कँडलमधील आरोपी भारताच्या पंतप्रधानांची अपॉइंटमेंट कशी काय ठरवू शकतो? असा सवाल त्यांनी केला. नाव समोर आल्यावर एकहीही व्यक्ती स्पष्टीकरण देत नाही. त्या माणसाचा ह्यांचा संबंध आला कसा आला हे समोर आले पाहिजे. या प्रश्नांची उत्तरे सरकारने जनतेला दिली पाहिजेत.”
अमेरिकेत जनक्षोभामुळे ‘एपस्टीन फाईल्स ट्रान्सफरन्सी ॲक्ट’ लागू करण्यात आला असून, त्यानुसार काल (१९ डिसेंबर) मोठ्या प्रमाणात माहिती सार्वजनिक करण्यात आली. “ट्रम्प यांना वाचवण्यासाठी माहिती दडपण्याचा प्रयत्न होत होता, पण कायद्यामुळे ३०० जीबी डेटापैकी काही माहिती समोर आली आहे. खासदार रो खन्ना यांनीही अजून पूर्ण माहिती मिळाली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी स्फोटक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मी अमेरिकेतील आणि इंग्लंडमधील वर्तमानपत्र रोज पाहतो. त्यातून होणाऱ्या चर्चेतून अमेरिकेत मोठे प्रकरण गाजतंय याची मला जाणीव झाली. त्याची आपल्याकडे कुणाला माहिती नव्हती. म्हणून मी एक डिसेंबर रोजी माध्यमांशी संवाद साधताना असे म्हटले होते की, हे प्रकरण खुले झाल्यानंतर भारताच्या राजकारणावर परिणाम होतील का? असा मी प्रश्न विचारला होता. कारण मला तसे वाटत होते. त्यावेळेला स्पष्ट पुरावा नसल्यामुळे मी कोणाची नावे घेतली नव्हती. पण आज पहिल्यांदा काही नावे घेतली, कारण त्यासंदर्भात पुरावे आलेले आहेत. त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे. त्याचा भारताच्या राजकारणावर त्याचा अमुलाग्र बदल होईल, अशी शंका बोलून दाखवली होती. त्याची खूप चर्चा झाली. देशभर ते विधान गाजले. त्यावेळी सूचित केले की, सरकारमध्ये मोठ्या पदावर बदल होऊ शकतील आणि ते बदल झाल्यावर काय होईल, याबद्दल एक विश्लेषण प्रस्तुत केले होते. त्यामुळे एपस्टीन फाईल्स ट्रान्सफरन्सी ॲक्टनुसार माहिती पुढे आलेली आहे. यामध्ये काही उच्चपदस्थ भारतीय असण्याची जी भीती होती, ती खरी निघायला लागलेली आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
या खुलाशांनंतर संबंधित लोक बचावासाठी पुढे येतील, असा अंदाजही पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवला. ज्यांच्याबद्दल पुरावे सापडले, ते नाहीच म्हणणार आहे. त्या प्रकरणाशी माझा संबंध नाही. ते मॉर्फ केलेले आहेत किंवा व्हिडिओ चित्रण बदलेले आहे, असे बहाणे सांगितले जातील. शेवटी ते सर्व जनतेच्या न्यायालयात खुले होईल. आपण अशा व्यक्तींवर सरकार चालवण्याची सुत्र ठेवायची की नाही, याचा जनतेला विचार करावा लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
या प्रकरणात अजून कॉम्प्रमाईज फोटोग्राफ्स अजून पुढे आलेले नाहीत किंवा सापडले नाहीत. आज रात्रभर अमेरिकन मीडिया आणि भारतात देखील शोध चाललेला आहे. कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे. त्यासाठी अमेरिकन सरकारने ‘एपस्टीन फाईल्स ट्रान्सफरन्सी ॲक्ट’ नावाने वेगळी वेबसाइट तयार केलेली आहे. त्या वेबसाइटवर जाऊन माहिती मिळू शकतो. त्या वेबसाइटवर एपस्टीनची आत्महत्यावेळचे सीसीटीव्ही फुटेज आहे. आतापर्यंत दोन खटले चालले, त्यात काय काय पुरावा दिला गेला? त्या महिलांशी साक्ष आहे. या वेबसाइटवर प्रचंड डिजीटल सामुग्री उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचे विश्लेषण करायला काही काळ लागेल. जगातील सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेले आहे. लवकरच आपल्याला समजेल असे विश्लेषण आपल्यासमोर काही दिवसांत येईल.

