मेजर एच.डी. मांजरेकर
उत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरण
रक्तदान शिबिराचे आयोजन
६१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
पुणे-(प्रतिनिधी)
५४ व्या विजय – दिनानिमित्त अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या वतीने व शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या सहकार्याने मेजर “एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम सलग चौथ्या वर्षी पुण्यातील एस.पी.कॉलेज येथे आयोजित केला होता.
या कार्यक्रमासोबत मोरया ब्लड बँक व एचडीएफसी बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
एन सी.सी,एन.एस.एस व इतर विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रम यशस्वी झाला.
एकूण ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमास अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) अध्यक्ष,शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड एस के जैन,एस पी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश मोहरील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये उपस्थितांना शिस्त,सेवा,बलिदान आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांबाबत मार्गदर्शन केले.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी झालेले व बांगलादेशात तैनात असलेले माजी सैनिक एअर कमोडोर आर एम श्रीधरन आणि ब्रिगेडियर अजित आपटे यांनी त्यांच्या प्रत्यक्ष युद्ध अनुभवांची मांडणी केली ज्यामुळे उपस्थित विद्यार्थी,नागरिक प्रेरित झाले.कार्यक्रमात मेजर मांजरेकर (८ गार्ड्स,मुंबईचे रहिवासी )आणि १९७१ मध्ये बांगलादेशातील हिली येथे भयंकर लढाईत दहशद देणारे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
उत्कृष्ट सर्वांगिण एनसीसी कॅडेट ट्रॉफी पुरस्कार असे
- कॅडेट प्रिता जाधव 3 महा नेव्हल,एनसीसी युनिट यांना देण्यात आली. इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये
•कॅडेट हर्षिता नाहिरे ३महा आर्म्ड एन सी सी,स्क्वॉड्रन युनिट,
•कॅडेट अद्वैत थोरात ३ महा नेव्हल एनसीसी युनिट आणि
•कॅडेट प्रिती तळेकर ३६ महा बटालियन एनसीसी युनिट यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचा समारोप कॅडेटसच्या यशाबद्दल अभिनंदन केले गेले.रक्तदान शिबिरातील उस्फुर्त सहभागाच्या कौतुकाने झाला.ज्यातून सेवा व राष्ट्रनिर्मितीचा संदेश अधिक दृढ झाला.

