पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाकडुन हिंजवडी माण फेज ३ मेगा पॉलिस ते सांगवी (मार्ग क्रमांक – ३७३) या नवीन
बस मार्गाचा शुभारंभ सांगवी येथे रविवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता पिंपरी – चिंचवडच्या
माजी महापौर माई ढोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी पिंपरी – चिंचवडच्या माजी नगरसेविका शारदा सोनवणे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजू साळवे व पिंपरी आगाराचे आगारव्यवस्थापक भास्कर दहातोंडे यांची प्रमुख उपस्थिती
होती.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने प्रवासी वर्गाची वाढती मागणीची दखल घेऊन हिंजवडी माण फेज ३ मेगा पॉलिस
ते सांगवी (मार्ग क्रमांक – ३७३) हा नवीन बसमार्ग सुरू केला असुन आय.टी. कर्मचारी व प्रवासी नागरिक यांचे करीता एक
चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. सदरची बससेवा सुरू झाल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे, अशी भावना
यावेळी प्रवासी नागरिक यांनी व्यक्त केली.
मार्ग क्रमांक ३७३ – हिंजवडी माण फेज ३ मेगा पॉलिस ते सांगवी या बससेवेचा मार्ग साई चौक नवी सांगवी,
काटेपूरम चौक, पिंपळेगुरव, पिंपळे सौदागर चौक, रहाटणीगांव, काळेवाडी फाटा, मानकर चौक, वाकड, इन्फोसिस फेज – १,
इन्फोसिस फेज – २, हिंजवडी माण फेज-३ सर्कल, मेगा पॉलिस फेज-३ असा असणार आहे. हिंजवडी माण फेज ३ मेगा
पॉलिस ते सांगवी पहिली बस सकाळी ०६.०० वा. तर शेवटची बस संध्याकाळी ०६.०० वा. आहे. तसेच सांगवी ते हिंजवडी
माण फेज ३ मेगा पॉलिस पहिली बस सकाळी ०७.२० वा. तर शेवटची बस रात्री ०७.२५ वा. आहे.