९ ते ११ ऑगस्ट दरम्यान जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

Date:

पुणे : ‘सोमेश्वर फाऊंडेशन’ आणि ‘क्रीडा जागृती’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातील एकुण १९० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सनीज वर्ल्ड, पाषाण सुस रोड, पुणे येथे ९ व १० ऑगस्ट २०२४ या कालावधीत रंगणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सनीज वर्ल्डचे संचालक सनी निम्हण यांनी सांगितले की, “ही स्पर्धा पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली आणि मुश्ताक बॅडमिंटन अकादमी यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. तसेच, हि स्पर्धा ११, १३, १५, १७, १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या एकेरी व १७ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात होणार आहे. स्पर्धेत सुमारे ५००००/- रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत वेदांत मोरे,अर्चित खान्देशे, मीर शहजार अली, आतिक्ष अग्रवाल, आरुष अरोरा, वरद लांडगे, श्रेयस मसलेकर, हृग्वेद भोसले, इशान आगाशे, दिविशा सिंग, कियारा साखरे, ख्याती कात्रे, समन्वय धनंजय, सिया बेहेडे, सिद्धी जगताप या मानांकित खेळाडूंचा समावेश असल्याचे निम्हण यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही- डॉ. गोऱ्हे

वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुण्यात पुनरावृत्ती; हुंडाबळी घटनेवर उपसभापती डॉ....