सामाजिक उपक्रमांचा उत्सव साजरा व्हायला हवा – महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा

Date:

  • अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे पोतराज समाजासाठी कार्यरत सह्याद्री मेडिकल एज्युकेशन फाऊंडेशनला ५१ हजार रुपयांची मदत

पुणे : समाजात अनेक प्रकारचे उत्सव होत असतात. परंतु हे उत्सव समाजाचे व्हायला हवेत. आपल्याला अनेक गोष्टी सहज मिळतात, त्यामुळे संघर्षाची जाणीव नसते. ही जाणीव समाजातील अनेक घटकांना असून त्यांना मदतीचा हात देण्याकरिता सामाजिक उपक्रमांचा उत्सव ठिकठिकाणी साजरा व्हायला हवा, असे मत महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट च्या वतीने मंडईतील बुरुड आळीत आयोजित म्हसोबा उत्सवात पोतराज समाजासाठी कार्यरत सह्याद्री मेडिकल एज्युकेशन फाऊंडेशनला ५१ हजार रुपयांची मदत देण्यात आली. यावेळी पेशवाई क्रिएशन्सचे राहुल येमुल, सौरभ अमराळे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.धर्मराज साठे यांनी ही मदत स्विकारली. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. 
शेखर मुंदडा म्हणाले, पोतराज समाजाकरिता डॉ. धर्मराज साठे यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या वडिलांना त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केल्याने ते आज एवढे मोठे कार्य उभे करु शकले. त्यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा. शिक्षणाचे किती महत्व आहे, हे आपल्याला यावरुन समजेल, असेही त्यांनी सांगितले. 

निवृत्ती जाधव म्हणाले, धार्मिकतेसोबत सामाजिकता जपताना दरवर्षी विविध संस्थांना मदत दिली जाते. पुढील वर्षीपासून उत्सवात भाकड गाईंना सांभाळणा-या गोशांचा देखील सन्मान केला जाईल, असे आश्वासन त्यांनी शेखर मुंदडा यांना दिले. कार्यक्रमानंतर सर्व मुलांकरिता स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...