‘पीएमपीएमएल’ कडून रामवाडी मेट्रो स्टेशन ते ईऑन आयटी पार्क या मेट्रो फिडर बस सेवेचा विस्तार इंटरनॅशनल टेक पार्क खराडी पर्यंत

Date:

पुणे- पीएमपीएमएल कडून मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवासी यांचेसाठी मेट्रो स्टेशन पासून इच्छित स्थळी जाणेकरिता रामवाडी
मेट्रो स्टेशन ते ईऑन आयटी पार्क, खराडी या मेट्रो फिडर बससेवेचा विस्तार इंटरनॅशनल टेक पार्क, खराडी पर्यंत करण्यात आला असून या विस्तारीत बससेवेचा शुभारंभ पीएमपीएमएल च्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे
यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. पीएमपीएमएल कडून सुरु करण्यात येत असलेल्या फीडर बससेवेमुळे
प्रवाशी नागरिकांना मेट्रो स्टेशन्स पर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे.

याप्रसंगी पुणे महामेट्रोचे महाव्यवस्थापक (एम.एम.आय.) कॅप्टन राजेंद्र सनेर-पाटील, उपमहाव्यवस्थापक
मनोज डॅनियल, कॅपिटालॅण्डचे व्हाईस प्रेसिडेंट ऋषिकेश राजहंस, सिनिअर मॅनेजर हेड अनिकेत फटाले, मार्केटिंग
मॅनेजर हेड सुमित कुमार, पीएमपीएमएल चे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतिश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी
सतिश गाटे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी नारायण करडे, भेकराईनगर डेपो मॅनेजर सुरेंद्र दांगट, पुणे स्टेशन डेपो
मॅनेजर संजय कुसाळकर, वाघोली डेपो मॅनेजर सोमनाथ वाघोले, हडपसर डेपो मॅनेजर दिपक वाळुंजकर,शेवाळेवाडी
डेपो मॅनेजर गुलाब गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेट्रो शटल २० या फिडर बससेवेचा तपशील खालीलप्रमाणे

१) रामवाडी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल टेक पार्क (खराडी) रामवाडी मेट्रो स्टेशन, वडगाव शेरी फाटा,
विमाननगर कॉर्नर, ५ वा मैल, टाटा गार्डन,चंदननगर, खराडी बायपास, जनकबाबा दर्गा,टाऊन डाऊन चौक खराडी, राघोजी चव्हाणचौक, वल्ड ट्रेड सेंटर क्र. ३ व ५, ईऑन गेटनंबर-२,इम्पेरिअल अल्फा कॉम्प्लेक्स,इंटरनॅशनल टेक पार्क (खराडी) सकाळी ०६.३० वा. व रात्री शेवटची बस ७.३० वा अश्या एकूण १४ फेऱ्या असतील तर

२) इंटरनॅशनल टेकपार्क (खराडी) ते रामवाडी मेट्रो स्टेशन रामवाडी मेट्रो स्टेशन ते इंटरनॅशनल टेक पार्क (खराडी) रामवाडी मेट्रो स्टेशन, वडगाव शेरी फाटा,
विमाननगर कॉर्नर, ५ वा मैल, टाटा गार्डन,चंदननगर, खराडी बायपास, जनकबाबा दर्गा,टाऊन डाऊन चौक खराडी, राघोजी चव्हाणचौक, वल्ड ट्रेड सेंटर क्र. ३ व ५, ईऑन गेटनंबर-२,इम्पेरिअल अल्फा कॉम्प्लेक्स,इंटरनॅशनल टेक पार्क (खराडी) सकाळी ०६.३० वा. व रात्री शेवटची बस ७.३० वा अश्या एकूण १४ फेऱ्या असतील तर

तरी सदरच्या फीडर बससेवेचा लाभ प्रवाशी नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...