साखर कामगारांच्या वेतन वाढ करण्यासंदर्भात राज्य सरकारने त्रिपक्षीय समिती तात्काळ गठीत करून वेतन वाढीचा करार पूर्ण करावा – मंत्री दिलीप वळसे पाटील

Date:

मुंबई – पुण्मयात आज साखर संकुल येथे साखर कामगारांनी साखर संकुल येथे आंदोलन केले होते त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतली.महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत या बैठकीला कामगार नेते व आमदार भाई जगताप, कामगार नेते सुनील शिंदे,अविनाश अधिक,राजेंद्र होनमाने,उदय भंडारी हे साखर कामगारांचे नेते उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार, महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त  डॉ  H P तुमोड व इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये साखर कामगारांच्या वेतन वाढ करण्यासंदर्भात राज्य सरकारने त्रिपक्षीय समिती तात्काळ गठीत करून वेतन वाढीचा करार पूर्ण करावा, त्याचबरोबर राज्यातील साखर कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे, ज्या साखर कारखान्यांनी त्रिपक्षीय समितीने केलेला करार व त्याप्रमाणे वेतन वाढ दिलेली नाही, अशा कारखानदारांना क्रशिंगचे लायसन देऊ नये, काही कारखान्यांनी कामगारांची देणे देण्यासाठी सरकारकडून त्याबरोबर काही बँकांकडून कर्ज घेतले आहे परंतु कामगारांची तिकीट देणे दिलेली नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीच्या मागण्या करण्यात आल्या. त्यावर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्रिपक्षीय समिती घटित करण्याबाबत आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याबाबत सांगितले. त्याचबरोबर साखर कामगारांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन त्यानंतर पुन्हा एकदा साखर कामगार नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन पुढील बैठक घेऊन योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...