काश्मीरमध्ये उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा

Date:

पुणे : लष्कराच्या सहकार्याने काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला असून महाराजांच्या या पुतळ्याकडे बघून जवानांना प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि भव्य स्मारक जम्मू-काश्मीरमध्ये उभारु, अशी घोषणा ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी केली. ‘विश्व हिंदू मराठा संघा’च्यावतीने स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने डेक्कन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुनीत बालन म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखा योद्धा या युगात झालेला नाही. मी भारतीय लष्करासमवेत काश्मीरमध्ये काम करतो. आपले भारतीय सैनिक जेंव्हा जेंव्हा युद्धाला जातात तेंव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे धैर्य, शौर्य आणि पराक्रम डोळ्यासमोर ठेवून लढत असतात. त्यांची ही प्रेरणाच आपल्या शूर जवानांना लढण्यासाठी मोठे बळ देत असते.’’ काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याठिकांणी रोज सकाळी साडेआठ वाजता महाराजांच्या पुतळ्याची आरती केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रमाणेच कश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा आणि स्मारक लष्कराच्या सहाय्याने आणि ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून विश्व हिंदू मराठा संघाला सोबत घेऊन उभारले जाईल. महाराजांच्या पुढील वर्षीच्या जयंतीच्या आधी स्मारकाचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही यावेळी पुनीत बालन यांनी दिली. यावेळी शहरातील प्रतिष्ठित मंडळी, शिव-शंभू भक्त आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखंड भारत देशाचे आराध्य दैवत आहे. स्वराज्य निर्माण करुन त्यांनी घालून दिलेला आदर्श हा आपल्या सर्वांसाठीच पथदर्शी आहे. आजच्या युवा पिढीनेही याच मार्गाने वाटचाल केली पाहीजे यासाठी या दोन्ही राजांची स्मारकं गरजेची आहेत. म्हणूनच आम्ही काश्मीर खोऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.’’ – पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान

पुणे,: "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक...

हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात मराठा ठोक मोर्चा आक्रमक:तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर

सोलापूर -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त...

इंग्रजांविरोधात लढणारे टिपू सुलतान देशद्रोही होते का?:दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता? आसिफ शेख यांचा सवाल

मालेगाव -कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल:शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपची तक्रार

पुणे-काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी...