टाटा टेक्नॉलॉजीजची प्राथमिक समभाग विक्री २२ नोव्हेंबरपासून सुरू

Date:

· टाटा टेक्नॉलॉजीज लि.च्या २ रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी ४७५ ते ५०० रुपये असा किंमतपट्टा निश्चित.

· अँकर गुंतवणूकदारांच्या बोलीचा दिवस – मंगळवार, दि. २१ नोव्हेंबर २०२३.

· बोली / ऑफर खुल्या होण्याचा दिवस – बुधवार, दि. २२ नोव्हेंबर २०२३, बोली / ऑफर बंद होण्याचा दिवस – शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर २०२३.

· गुंतवणूकदारांना किमान ३० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३० इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.

युनायटेड स्टेट्समध्ये सिक्युरिटीजची विक्री करण्यासाठी हा दस्तऐवज पात्र नाही. युनायटेड स्टेट्स सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनमध्ये नोंदणी नसताना किंवा तेथे नोंदणीत सूट मिळालेली नसताना, तिथे या सिक्युरिटीज दिल्या किंवा विकल्या जाऊ शकत नाहीत. युनायटेड स्टेट्समध्ये या सिक्युरिटीजची कोणतीही सार्वजनिक विक्री होणार नाही.

मुंबई, दि. १७ नोव्हेंबर २०२३ : टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड (कंपनी) या जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन विकास क्षेत्रातील डिजिटल सेवा कंपनीने आपल्या ६०,८५०,२७८ इक्विटी शेअर्सची प्राथमिक विक्री करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. येत्या बुधवारी, दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी ही विक्री सुरू होईल. शेअर्ससाठीची बोली / ऑफर बंद होण्याची शेवटची तारीख शुक्रवार, २४ नोव्हेंबर २०२३ असेल. बोली / ऑफर खुल्या होण्याच्या एक दिवस अगोदर, म्हणजे मंगळवारी, दि. २१ नोव्हेंबर २०२३ रोजी अँकर गुंतवणूकदारांना बोली लावता येईल.
या ऑफरसाठी शेअर्सचा किंमतपट्टा ४७५ ते ५०० रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना यामध्ये किमान ३० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यापुढे ३० इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.
कंपनीच्या या आयपीओमध्ये ६०,८५०,२७८ इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर रोख रकमेसाठी असणार आहे. तसेच (अ) टाटा मोटर्स लिमिटेडद्वारे ४६,२७५,००० इक्विटी शेअर्सची विक्री, (ब) अल्फा टीसी होल्डिंग्ज पीटीई लि.द्वारे ९,७१६,८५३ इक्विटी शेअर्सची विक्री आणि (क) टाटा कॅपिटल ग्रोथ फंड-१ द्वारे ४,८५८,४२५ इक्विटी शेअर्सची विक्री यांचा त्यात समावेश आहे.
‘सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स’मधील नियम क्र. ३१मध्ये नमूद केल्याप्रमाणे, सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) नियम, १९५७च्या नियम १९(२)(बी), सुधारित (“एससीआरआर”) नुसार ही ऑफर देण्यात येत आहे. ‘सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स’मधील नियमावली ६(२) नुसार, ही ऑफर ‘बुक बिल्डिंग’ प्रक्रियेद्वारे केली जात आहे. यामध्ये निव्वळ ऑफरच्या किमान ५० टक्के भाग हा पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“क्यूआयबी” आणि त्यांच्यासाठीचा “क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. कंपनी लीड व्यवस्थापकांशी सल्लामसलत करून ‘क्यूआयबी पोर्शन’च्या ६० टक्क्यांपर्यंतचा हिस्सा ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना विवेकाधीन आधारावर वाटप करू शकेल आणि त्यातील एक तृतियांश भाग हा केवळ देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव ठेवण्यात येईल, हे यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना देण्यात येणाऱ्या किंमतींपेक्षा अधिक रकमेची बोली देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून सादर होणे अपेक्षित आहे. ‘आयपीओ’ला कमी प्रतिसाद मिळाला किंवा ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना शेअर्सचे वाटप झाले नाही, तर उर्वरीत इक्विटी शेअर्स ‘नेट क्यूआयबी पोर्शन’मध्ये समाविष्ट केले जातील.

याशिवाय, ऑफर प्राईसच्या बरोबरीची किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची वैध बोली आल्यास, ‘नेट क्यूआयबी पोर्शन’चा ५ टक्के भाग केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणित आधारावर वाटपासाठी उपलब्ध असेल आणि उर्वरित ‘नेट क्यूआयबी पोर्शन’ हा म्युच्युअल फंडांसह सर्व ‘क्यूआयबी बोलीदारां’साठी (अँकर इन्व्हेस्टर्सव्यतिरिक्त) प्रमाणित आधारावर वाटपासाठी उपलब्ध असेल.
याशिवाय, या ऑफरमधील १५ टक्क्यांपेक्षा कमी शेअर्स बिगर-संस्थागत बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध असतील, उदा. (अ) ज्या अर्जदारांनी २ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १० लाख रुपयांपेक्षा कमी रकमेची बोली लावली असेल, अशांना बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सचा एक तृतीयांश भाग आरक्षित करून देण्यात येईल, आणि (ब) ज्या १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची बोली लावली असेल, अशांना बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सचा दोन तृतीयांश भाग आरक्षित करून देण्यात येईल. या (अ) आणि (ब) या दोन्ही श्रेणींपैकी कोणत्याही श्रेणीत शिल्लक राहिलेले शेअर्स बिगर-संस्थागत बोलिदारांमधील इतर उप-श्रेणीसाठी काढून देण्यात येतील. मात्र याकरीता या बोली ऑफर किंमतीइतक्या किंवा त्यापेक्षा अधिक मूल्याच्या असायला हव्यात. तसेच सेबी आयसीडीआरच्या नियमांनुसार, किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना वाटपासाठी ३५ टक्क्यांहून कमी शेअर्स उरणार नाहीत, हेही बघावे लागेल. यामध्येही ऑफर किमतीइतक्या वा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोली येणे अपेक्षित असेल.
‘द एम्प्लॉई रिझर्व्हेशन पोर्शन’च्या अंतर्गत शेअर्ससाठी अर्ज करणार्‍या पात्र कर्मचार्‍यांनी ऑफर किमतीच्या बरोबरीची किंवा त्याहून अधिक रकमेची वैध बोली लावल्यास, त्यांना इक्विटी शेअर्सचे वाटप केले जाईल. सर्व बोलीदारांना (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता) ‘अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट’ (“एएसबीए”) प्रक्रियेचा वापर करणे अनिवार्य आहे. आपल्या संबंधित एएसबीए खात्याचा तपशील आणि ‘आरआयबी यूपीआय मेकॅनिझम’ वापरत असल्यास ‘यूपीआय’चा आयडी त्यांना याकरीता द्यावा लागेल. त्यानुसार त्यांच्या संबंधित बोलीची रक्कम ‘सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकां’द्वारे (“एससीएसी”) किंवा यूपीआय यंत्रणेंतर्गत प्रायोजक बँकेद्वारे, संबंधित बोली रकमेच्या मर्यादेपर्यंत ब्लॉक केली जाईल. ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना ‘एएसबीए’ प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड या दोन्हींवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
जेएम फायनान्शिअल लि., सीटीग्रूप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रा. लि. आणि बीओएफए सिक्युरिटीज इंडिया लि. या कंपन्यांना या ऑफसमध्ये बुक रनिंग लीड मॅनेजर (बीआरएलएम) म्हणून नेमण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...