हमीभावापोटी शेतकऱ्यांना दिले 1,45,845 कोटी रुपये
नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी 2023 खरीप विपणन हंगाम(केएमएस) 2022-23 साठी 20.02.2023 पर्यंत 702 लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त खरेदीसह धान खरेदी सुरळीतपणे सुरू आहे. याआधीच 96 लाखांहून अधिक शेतकर्यांना सुरू असलेल्या केएमएस खरेदी प्रक्रीयेचा लाभ झाला आहे. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 1,45,845 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.सुविहित खरेदी प्रक्रियेसाठी सर्व व्यवस्था केली आहे. 20.02.2023 पर्यंत मध्यवर्ती साठ्यात खरेदी केलेल्या धानाच्या तुलनेत वितरण सुमारे 218 लाख मेट्रीक टन आहे. देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रीय साठ्यात सध्या पुरेसा तांदूळ साठा उपलब्ध आहे.चालू केएमएस 2022-23 च्या खरीप हंगामासाठी, मागील केएमएस 2021-22 मध्ये प्रत्यक्षात खरेदी केलेल्या 749 लाख मेट्रीक टन धानाच्या (तांदूळाच्या बाबतीत 503 लाख मेट्रीक टन) तुलनेत 765.43 लाख मेट्रीक टन धान (तांदूळाच्या बाबतीत 514 लाख मेट्रीक टन) खरेदीचा अंदाज आहे.केएमएस 2022-23 च्या रब्बी हंगामासाठी धानाची अंदाजे खरेदी 01.03.2023 रोजी होणाऱ्या आगामी खाद्यान्न सचिवांच्या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. रब्बी पिकाच्या समावेशासह, संपूर्ण केएमएस 2022-23 मध्ये सुमारे 900 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी होण्याची अपेक्षा आहे.