मुंबई-भाजप आमदार राहुल कुल यांना राज्य सरकारने दिली क्लिन चीट दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखील तक्रार देखील केली होती.पुणे जिल्ह्यातील दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराबाबत सरकारने आमदार राहुल कुल यांना ही क्लिन चीट दिली आहे. साखर कारखान्यात कोणताही घोटाळा झाला नाही, असे या संदर्भात दिलेल्या उत्तरात सांगण्यात आले आहे.
2022-23 चा लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाला नसला तरी 2021-22 चा लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे राज्य सरकारने लेखी उत्तरात म्हटले आहे. विधान परिषदेतील तारांकित प्रश्नोत्तरात राज्य सरकारने हे उत्तर दिले आहे.
खासदार संजय राऊत यांचे वारंवार आरोप
या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आमदार राहुल कुल यांच्यावर वारंवार आरोप करत आहेत. तसेच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिले होते. राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला होता.
चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक
या प्रकरणी सरकारने क्लिन चीट दिलेली असली तरी 2021-22 व्यतिरीकत इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी सरकारने चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.

