कोलकाता- ढोल-ताशांमुळे होणारा त्रास नियंत्रित करण्याचे आदेश कलकत्ता हायकोर्टाने पश्चिम बंगाल पोलिस आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवगणनम आणि न्या. हिरण्मय भट्टाचार्य यांचे खंडपीठ म्हणाले, राज्य सरकारने घटनेच्या कलम २५(१) अंतर्गत धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम १९(१)(ए) अंतर्गत जीवनाच्या अधिकारासोबत संतुलित केला पाहिजे. कोर्टाने तोंडी सांगितले की, जे पसंत नाही किंवा ज्याची आवश्यकता नाही, असे काहीतरी ऐकण्यासाठी नागरिकास बाध्य केले जाऊ नये. पोलिसांनी ढोल आणि ताशे वाजवण्याची वेळ निश्चित करून त्याची सार्वजनिक सूचना द्यावी. ही वेळ सकाळी ८ वाजेपूर्वीची नसली पाहिजे. साधारणत: सकाळी २ तास आणि सायंकाळी २ तासांची परवानगी दिली जाते. सायंकाळी ७ वाजेनंतर असे होऊ नये, असे कोर्ट म्हणाले.
हायकोर्टाने बंगाल सरकारला खडसावले:सतत ढोल-ताशे वाजवणे चुकीचे, कोणताच धर्म असे म्हणत नाही
Date:

