पुणे- अंमली पदार्थ विरोधी पथक – ०१, गुन्हे शाखा पुणे शहर,गुन्हे शाखेकडुन ३,२२,६५०/- रु किचे अंमली पदार्थ त्यामध्ये १५० ग्रॅम अफिम व ६३२ ग्रॅम गांजा असे अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करुन दोघांना भारती विदयापीठ व हडपसर परिसरातुन अटक केली आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार,सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन जास्तीत जास्त अंमली पदार्थ तस्कर यांचे विरुध्द माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना दिले होते.त्याअनुशंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक – ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक २०/०७/२०२३ रोजी पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पेट्रोलिंग दरम्यान पोलीस अंमलदार, प्रविण उत्तेकर व संदिप शिर्के यांना माहिती मिळाली की, मांजरी गुंढवा रोडवरील सर्व्हे नंबर १५६ / ६, साई कॉर्नर, गवळी वस्ती, मांजरी बुद्रुक, पुणे येथील सार्वजनिक रोडवर एक महिला गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्याने, त्याबाबत कायदेशिर सोपस्कार पार करुन छापा कारवाई केली असता, सदर महिला ही तिचे ताब्यात १२,६५० /- किचा ६३२ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करताना मिळुन आली असुन, तीचेविरुध्द हडपसर पो स्टे येथे गुरनं. १०६७/२०२३,एन डी पी एस अॅक्ट ८ (क), २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
तसेच दि. २१/०७/२०२३ रोजी भारती विदयापीठ पो स्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार,पांडुरंग पवार व सचिन माळवे यांना माहिती मिळाली की, भारती विहार सोसायटी गेट समोरील सार्वजनिक रोडवर, भारती विद्यापीठ पुणे येथे इसम नामे वीरमाराम कोजाराम विश्नोई हा अफिम हा अंमली पदार्थ विक्री करीत आहे. त्याबाबत कायदेशिर सोपस्कार पार करुन छापा कारवाई केली असता, इसम नामे वीरमाराम कोजाराम विश्नोई, वय – ३० वर्षे, रा. नरेश चौहान यांचे रुममध्ये, गल्ली नं. ३ टिळेकरनगर, कोंढवा, पुणे मुळ रा. विश्नोईयोंकी ढाणी, शोभाला जैतमाल, ता. घोरीमन्ना, जि. बाडमेर राज्य राजस्थान याचे ताब्यात ३,१०,००० /- रु किचा ऐवज त्यामध्ये १५० ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ ३,००,०००/- रु किचा, तसेच १०,०००/- रुकिंचा एक विवो कंपनीचा मोबाईल असा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला. म्हणुन त्याचेविरुध्द भारती विदयापीठ पो स्टे गुरनं. ४८४/२०२३, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ( क ), १७ ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमुद प्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथक – ०१ मार्फत मागील दोन दिवसात सातत्याने अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन एकुण ३,२२,६५०/- रु किचे अंमली पदार्थ, त्यामध्ये १५० ग्रॅम अफिम व ६३२ ग्रॅम गांजा व इतर ऐवज जप्त करुन एक इसम व एक महिला यांना भारती विदयापीठ व हडपसर परिसरान केले जेरबंद केले आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी हीपोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे,सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – ०१, सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक – ०१, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, मनोजकुमार साळुंके, राहुल जोशी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.
भारती विदयापीठ व हडपसर परिसरातुन सव्वातीन लाखाचे अंमली पदार्थ पकडले, दोघांना अटक
Date:

