नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांची व्हिएतनाम भेट

Date:

भारतीय नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार हे व्हिएतनामच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आज, 22 जुलै 2023 रोजी भारतीय नौदलातील कृपाण हे जहाज सेवामुक्तीनंतर व्हिएतनाममधील कॅम रॉन येथे व्हिएतनाम पीपल्स नेव्ही (VPN) कडे सुपूर्द केले जाणार असून, भारतीय नौदल प्रमुख या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

भारतीय नौदलाकडून व्हिएतनाम पीपल्स नेव्हीकडे स्वदेशी बनावटीचे, क्षेपणास्त्र सज्ज जहाज आयएनएस कृपाणचे हस्तांतरण, हे समविचारी भागीदारांना त्यांची क्षमता आणि कार्यकुशलता वाढवण्यासाठी मदत करण्याची भारताची वचनबद्धता अधोरेखित करते. हे हस्तांतरण भारत सरकारच्या ‘ॲक्ट ईस्ट’ तसेच सागर (SAGAR) अर्थात ‘प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास‘ या धोरणांशी सुसंगत आहे. मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या एखाद्या राष्ट्राला भारताकडून संपूर्णपणे सक्रिय असणारी युद्धनौका भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

19 जून 2023 रोजी व्हिएतनामला पूर्णपणे सक्रिय असलेली क्षेपणास्त्र सज्ज युद्धनौका भेट देण्याच्या संरक्षणमंत्र्यांच्या घोषणेला अनुसरून, स्वदेशी बनावटीचे खुकरी-श्रेणीची ही आयएनएस कृपाण युद्धनौका व्हिएतनाम पीपल्स नेव्हीकडे सुपूर्द केली जात आहे. या हस्तांतरणासाठी आयएनएस कृपाण भारतीय तिरंगा फडकवत 28 जुन 2023 रोजी भारतातून व्हिएतनामकडे रवाना झाली आणि 8 जुलै 2023 रोजी व्हिएतनाममधील कॅम रॉन येथे दाखल झाली.

अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार हे व्हिएतनाम पीपल्स नेव्हीच्या मुख्यालयात, सीआयएनसी व्हाइस ॲडमिरल तन तनहा नेगिम यांच्याशी द्विपक्षीय संवाद साधणार आहेत. तसेच ते व्हिएतनामच्या संरक्षण मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत.

भारतीय नौदल प्रमुखांचा हा दौरा भारतीय नौदल आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्ही यांच्यातील उच्चस्तरीय द्विपक्षीय सहकार्याचे महत्व अधोरेखित करणारा असून भारताच्या क्षेत्रातील आसियानच्या मध्यवर्ती भूमिकेप्रति आदर व्यक्त करणारा आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...