पुणे- आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने भाजपने पुणे शहर अध्यक्षपदावरून जगदीश मुलीक यांना दूर करून धीरज रामचंद्र घाटे यांची नियुक्ती केली आहे . त्यांची हि नियुक्ती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी जाहीर केली आहे. घाटे हे महापालिकेत माजी सभागृह नेते देखील होते. तसेच पार्टी मध्ये विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वयंसेवक राहिले असून काही काळ त्यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून देखील काम केलं आहे,कट्टर हिंदुत्ववादी असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.महाराष्ट्रातील ७० अध्यक्षांच्या नियुक्त्या बावनकुळे यांनी केल्या आहेत त्यात
पुणे शहर-धिरज रामचंद्र घाटे,
पुणे ग्रामीण (बारामती) -वासुदेव नाना शंकरराव काळे
पुणे – मावळ:शरद आनंदराव बुट्टे पाटील
पिंपरी चिंचवड-शंकर पांडुरंग जगताप
यांचा समावेश आहे .आज सकाळी या संदर्भात बावनकुळे यांनी असे म्हटले आहे कि,भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करत आहे. राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. मला खात्री आहे, माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. या सर्वच सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत. भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबध्द आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. नवनियुक्त सर्व जिल्हाध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष मजबूत करायचा आहे.

