पुणे-पिंपरी चिंचवड जैन समाज संघाच्या वतीने चार महासाध्वी यांचे शहरात आगमन होत असल्याने आज ( शनिवारी) भव्य शोभायात्रा काढून त्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती यांनी आज पत्रकार परिषदेत युवा मंडल चे महामंत्री आशीष झगड़ावत आणि अन्य युवा मंडलचे साथी, युवा अध्यक्ष पवन लोढ़ा यांनी उपस्थितांना दिली.जैन समाज संघ, निगडी प्राधिकरणाच्या वतीने पुणे येथील जैन दिवाकरीय दक्षिण चन्द्रिका महासाध्वी, प.पु.डॉ.श्री संयमलताजी म.सा., प.पु. साध्वी श्री अमितप्रज्ञाजी म.सा., प.पु. साध्वी श्री कमलप्रज्ञाजी म.सा., प.पु. साध्वी श्री सौरभप्रज्ञाजी या चार महासाध्वी यांचा चातुर्मास प्रारंभास शनिवार पासून सुरूवात होत आहे. मंगल प्रवेश व शोभा यात्रेला आज शनिवारी सकाळी साडेसात वाजता निगडी येथील ‘मितेशकुंज’ येथून भव्य मिरवणूकीने सुरूवात होऊन लोकमान्य हॉस्पिटल TV-भेळ चौक -बिग इंडिया -हुतात्मा चौका मार्गे पाटीदार भवन येथे समाप्त होईल. या यात्रेत एक राजा राणी रथ, १४ स्वप्न रथ,बाल शिवाजी,भगत सिंग,झाशीची राणी या वेशभूषेत शेकडो शालेय विद्यार्थी,महिला,तरुण-तरुणी सहभागी होणार आहेत.तिथे साध्वीजी सर्वांना संबोधित करणार आहेत. मंडळाचा संपूर्ण चातुर्मास पाटीदार भवन मध्ये होणार असून येणाऱ्या पाच महिन्यात प्रवचन, धार्मिक व सामाजिक कामेही केली जाणार आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर व जिल्ह्यातील लहानांपासून थोरांपर्यंत समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा अध्यक्ष पवन मनोहरलाल लोढा यांनी दिली आहे.
चातुर्मास मंगल प्रवेशानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात आज शोभा यात्रा
Date:

