पुणे- २६ जून २०२३ – इंडसइंड बँकेने आज त्यांच्या ‘इन्स्टिट्यूटशन ऑन सोलर’ या सीएसआर उपक्रमाअंतर्गत पुण्यातील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्रात (रूफटॉप ग्रिड कनेक्टेड) सौर पॅनेल्स बसवण्याचे काम पूर्ण केले. यामध्ये मोठ्या आकाराच्या, १०० केडब्ल्यू ग्रिड सोलर फोटोव्होल्टेक सिस्टीमचा समावेश असून त्याद्वारे दरवर्षी १,४०,००० युनिट्स वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे ११३ मेट्रिक टन्स कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. त्याशिवाय यामुळे हॉस्पिटल्सच्या खर्चात बचत करणे शक्य होणार असून ती रक्कम सामाजिक उपक्रम, उपकरणांची खरेदी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अशा कामांसाठी वापरता येईल.’
या उपक्रमाच्या माध्यमातून बँकेने कमी- कार्बन उत्सर्जन असलेल्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने जाण्याचे आणि विकासाच्या शाश्वत पद्धतींचा वापर करण्याचे ठरवले आहे. बँकेचा ‘इन्स्टिट्यूटशन ऑन सोलर’ हा सीएसआर उपक्रम शाश्वत बँकिंग आणि पर्यावरणीय जबाबदारीवर लक्ष केंद्रित करणारा आहे. या उपक्रमाअंतर्गत २०२३ पर्यंत २० वेगवेगळ्या ठिकाणी ८२३ किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसवण्यात आली आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलचे विश्वस्त/वरिष्ठ अधिकारी आणि अमलबजावणी भागीदार सीईआरई यांच्या उपस्थितीत सौर पॅनेल्सचे उद्घाटन केले.
या कामगिरीविषयी इंडसइंड बँकेच्या शाश्वत बँकिंग आणि सीएसआर विभागाच्या प्रमुख रूपा सतिश म्हणाल्या, ‘एक बँक या नात्याने आमचा प्रभाव आर्थिक यंत्रणेच्याही पलीकडे जातो याची जाणीव इंडसइंड बँकेला आहे. अर्थव्यवस्था, समाज आणि पर्यावरण यांना समान प्रयत्नांनिशी उंचावर नेण्यासाठी आम्ही बांधील आहोत. पुण्यातील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्रात सौर पॅनेल्स बसवून आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्यास प्रयत्नशील असल्याची बांधिलकी पली आहे. बँकेने कायमच समाजहितासाठी हातभार लावण्यास प्राधान्य दिले आहे व यापुढेही अशाप्रकारच्या विधायक कामांसाठी आम्ही योगदान देत राहू.’

