संत निरंकारी मिशनचा महिला संत समारोह उत्साहात संपन्न

Date:

सत्संग ,सेवा, सिमरण भक्तीचे शृंगार


पुणे, २६ जून २०२३ :
            सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वादाने ,पुणे झोनचा महिला संत समागम संत निरंकारी सत्संग भवन जयजवाननगर,खराडी (फॉरेस्ट पार्क) या ठिकाणी रविवार दि.२५ जून रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या सत्संग कार्यक्रमासाठी पुणे झोनच्या सर्वच शाखांमधून ३५०० पेक्षा अधिक संख्येने महिलांनी पोहोचून सत्संगाचा आनंद प्राप्त केला. मुख्य सत्संगच्या अगोदर ब्रम्हनादाचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला त्यामध्ये महाराष्ट्रातील प्राचीन संत परंपरेचा इतिहास दाखविण्यात आला. महिलांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हुबेहूब दर्शन घडवून दिले.मुख्य सत्संग दरम्यान समुह गायन,अभंग,कविता,लघुनाटिका तसेच विचारांच्या माध्यमातून महिलांनी सद्गुरु प्रती आपले भाव व्यक्त केले.
            ज्या पद्धतीने एक नारी आपला शृंगार करताना कपडे,दागिने अशा एक एक सर्व गोष्टीचे ध्यान ठेऊन शृंगार करते तेव्हा तिचं रूप देखणं बनत त्याप्रमाणे सत्संग, सेवा सुमीरण हे भक्तीचे शृंगार आहेत. आपले जीवन भक्तीने सुंदर बनवायचे असेल तर भक्तीचे हे शृंगार या आपल्या भक्तीत चढविले पाहिजेत तेव्हाच आपली भक्ती देखील पूर्णत्वाला जाणार आहे असे उद्गार दीपा मखिजा यांनी सत्संगला संबोधित करताना काढले. त्यांनी पुढे समजावताना सांगितले की जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गुरू येत नाहीत तोपर्यंत भक्तीला सुरुवात होत नाही . संत मीराबाई,संत ज्ञानेश्वर जी,संत मुक्ताबाई,संत तुकाराम महाराज अशा अनेक संतांनी सद्गुरुंकडून ब्रम्हज्ञान प्राप्त करून आपल्या भक्तीला सुरवात केली. केवळ ज्ञान प्राप्त करण्याने नाही तर ज्ञानाप्रमाणे जीवन जगण्याने जीवनात आनंद प्राप्त होणार आहे. सत्संग,सेवा सिमरणाचे महत्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की नित्यप्रती सत्संग केल्याने आपल्या मनातील विवेक जागृत होऊन योग्य काय अयोग्य काय याचा बोध होतो आणि आपले मन भक्तीमध्ये तल्लीन व्हायला लागते. सेवा केल्याने मनामध्ये असलेला अभिमान नष्ट होऊन भक्ती मजबूत होते आणि सिमरणाने आत्मा परमात्म्याशी एकरूप होऊन मनाला परमानंदाची प्राप्ती होते. जे भक्त नित्यप्रती सत्संग,सेवा,सिमरणाचा आधार जीवनामध्ये घेतात तेच आपल्या जीवनामध्ये भक्तीला कायम करतात. जेव्हा एक नारी आपले जीवन भक्तीच्या या शृंगारानी सजवते तेव्हा त्या घरातील वातावरण स्वर्गमय बनून जाते.आज नारी आध्यात्मिक,सामाजिक,राजकीय,क्रीडा,शैक्षणिक,देशसेवा अशा सर्वच  क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे.   पुष्पा करमचंदानी आणि काबुगडे बहेन यांनी डोंबिवली वरून आलेल्या मुख्य अतिथी दीपा मखिजा तसेच संपूर्ण पुणे झोन मधून आलेल्या महात्मा, बहेंनजींचे स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धन्यवाद व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...