Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

लोकशाहीच्‍या विरोधात षडयंत्र करणा-यांचा बिहारमध्‍येच सुपडा साफ हाईल-केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

Date:

मुंबई, -ज्‍या बिहारमधून जयप्रकाश नारायण यांनी संपुर्ण क्रांतीचा नारा दिला, जी बिहारची भूमी ही लोकशाहीची जननी आहे, त्‍याच बिहारमध्‍ये लोकशाहीच्‍या विरोधात षडयंत्र जे पक्ष करीत, परिवारवादासाठी जे एकत्र आले आहेत, त्‍यांचा तर देशातून होईलच पण बिहारमधूनही सुपडा साफ होईल, असे भाकीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल येथे केले.

मुंबई भाजपातर्फे वांद्रे पश्‍चिम येथील रंगशारदा सभागृहात आणिबाणीचा निषेध करण्‍यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्‍ते म्‍हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना आमंत्रीत करण्‍यात आले होते, तर राज्‍याचे मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अँड आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, सुनिल राणे, मनिषा चौधरी, अमित साटम, भारती लव्‍हेकर, महामंत्री संजय उपाध्‍याय, माजी खासदार किरिट सोमय्या आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आमदार योगेश सागर यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक करताना आमदार अतुल भातकळकर यांनी हा काळा दिवस का लक्षात ठेवलाय हावा याचे महत्‍व विषद करुन आणिबाणीच्‍या काळात तत्‍कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कॉंग्रेसने कसे अत्‍याचार केले, याबाबत सविस्‍तर विवेचन केले. आज आपआपले परिवार वाचवण्‍यासाठी आता देशातील परिवारवादी पक्ष बिहारमध्‍ये एकत्र आले होते, ही एक नाटक कंपनी आहे, अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली.
तर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपल्‍या भाषणात आणिबाणीची दाहकता मांडली.
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्ष म्‍हणून भाषण करताना आमदार अँड आशिष शेलार म्‍हणाले की, आज भाजपच्‍या सरकारवर जे जे खोटे आरोप केले जात आहेत, पुरस्कार वापसी केली जातेय, ते सगळे कॉंग्रेसने आणिबाणीच्‍या काळात करुन दाखवले आहे. निवडणुक यंत्रणेचा गैरवापर, न्‍यायालयांची मुस्‍कटदाबी, लेखन, भाषण स्‍वातत्र्यावर बंदी, मिडिया हाऊसवर बंदी हे ज्‍या कॉंग्रेसने केले तेच आज लोकशाही वाचवण्‍याची गोष्‍ट करीत आहेत.
तर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्‍हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिले त्‍या घटनेच्‍या मुळ गाभ्‍याला धक्‍का लावून कॉंग्रेसने या देशावर आणिबाणी लादली, हा या देशाच्या घटनेचा अपमान तर होताच तसाच तो लोकशाहीचा आणि घटनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान करण्‍याचे काम कॉग्रेसने केले. एवढेच नव्‍हे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न देतानाही कॉंग्रेसने असेच केले होते.

परिवार वाचविण्‍यासाठी कॉंग्रेसने आपल्‍या देशावर आणिबाणी लादली होती, आणि आजही आपआपला परिवार वाच‍विण्‍यासाठी बिहारमध्‍ये एकत्र येत आहेत. जे लालूप्रसाद यादव, नितिश कुमार आणि मुलायम सिंह आणिबाणीच्‍या विरोधात लढले तेच आज कॉंग्रेसच्‍या परिवारवादाला साथ देत आहेत. पण बिहारची भूमीही क्रांतीची भूमी आहे, ती यांचा पाखंडीपणा मान्‍य करणार नाही, बिहारची भूमीही नागरीकांच्‍या हक्‍कासाठी आवाज उठवणारी, मान, मर्यादांची भूमी आहे, ती यांच्‍या पाखंडीपणाला साथ देणार नाही. एकिकडे लोकशाहीच्‍या नावाने हे सगळे पक्ष गळा काढतात तर दुसरीकडे घराणेशाही वाचविण्‍यासाठी एकत्र येऊन लोकशाहीचाच गळा घोटण्‍याचे काम करीत आहेत, अशी दुटप्पी भूमिका घेणा-यांना देश तर माफ करणार नाहीच पण बिहारमधूनही यांचा येत्‍या काळात सुपडा साफ हाईल, असा विश्‍वास भूपेंद्र यादव यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.
आज मी विदर्भातील अनेक भागात दौरा करुन कार्यक्रमासाठी आलो आहे, समाजातील विविध घटकांशी आम्‍ही संवाद साधला आहे, प्रत्‍येकजण मान्‍य करतोय की, उध्‍दव ठाकरे यांच्‍या शिवसेनेने भाजपाला धोका दिला होता. त्‍यामुळे आताच्‍या शिंदे- फडणवीस सरकारला प्रचंड जनसमर्थन महाराष्‍ट्रात मिळते आहे. , असे निरिक्षणही त्‍यांनी नोंदवले. त्यांनी आपल्या भाषणात आणिबाणचा काळ आणि काँग्रेसने केलेले अत्याचार यावर सविस्तर विवेचन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गेल्या 9 महिन्यांत 781 शेतकऱ्यांनी संपवले जीवन

नागपूर - राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा गंभीर प्रश्न विधान...

गुटखा विक्री करणा-या हडपसरच्या पती व पत्नीवर गुन्हा दाखल

पुणे- सरार्स गुटखा विक्री करून माया कमाविणाऱ्या हडपसर येथील...