पुणे- २३ वर्षीय तरुणाला जबरदस्तीने कार मध्ये बसवून पळवून नेणाऱ्या तिघांना अटक करून या तरुणाची गुजरात मधील वापी येथून सुटका करण्यात पुणे पोलिसांनी कौशाल्यापुर्वक यश मिळविले आहे . या अपहरण झालेल्या तरुणाच्या जुळ्या भावाने पोलिसात तक्रार केल्यावर २४ तासात पुणे पोलिसांनी हि कामगिरी फत्ते केली .
याप्रर्णी पोलिसांनी सांगितले कि ,’ उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी त्याचा जुळा भाऊ दिलीप गोरख पवार, वय २३ वर्ष यासदि. २२/०६/२०२३ रोजी ठाकुर गॅरेज समोर, कोढवे धावडे, पुणे येथून एक महिला व इतर ०२ अनोळखी इसमांनी संगनमताने एका पांढ-या रंगाच्या चारचाकी गाडीतुन कोणत्या तरी कारणासाठी पळवुन नेले आहे त्याने तक्रार दिल्याने उत्तमनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ७२ / २०२३ भा. द. वि. कलम ३४१, ३६३, ३६४, ३६५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला .
दाखल गुन्हयातील अपहरण झालेला मुलगा दिलीप पवार यास चार चाकी वाहनातुन अपहरण करुन पळुन नेणा-या एका महिला आरोपी चा शोध घेत असताना तांत्रिक माहितीच्या आधारे ते हॉटेल यात्री, वापी रेल्वे स्टेशन जवळ, वापी वडसाल, गुजरात येथे असल्याचे समजले. वरिष्ठांच्या आदेशाने गुजरात येथे सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार ,पोलीस नाईक हजारे, पोलीस शिपाई हुवाळे,पाडाळे, असे यांना तपास कामी रवाना केले होते. त्यांनी शिताफिने छापा टाकुन हॉटेल यात्री निवास, वापी, गुजरात येथुन अपहरण केलेला मुलगा दिलीप पवार व महिला आरोपी हिस ताब्यात घेतले व दाखल असलेल्या गुन्हयातील अपह्रत मुलगा दिलीप गोरख पवार, याची गुन्हा दाखल झाल्यापासुन २४ तासाच्या आत सुटका केली आहे. तिला उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे आणुन तिच्याकडे कौशल्यपुर्वक तपास तिला मदत करणारे साथीदार प्रथमेश राजेन्द्र यादव वय २१ रा.बच्छाव वस्ती, पुसेगाव ता. खटाव जिल्हा सातारा व अक्षय मारुती कोळी, वय २६ रा. पुसेगाव गोरेवस्ती, ता.खटाव, जि. सातारा असे असल्याचे निष्पन्न झाले. तात्काळ नमुद साथिदारांना पुसेगाव येथे तपास पथकाने जावुन शिताफीने ताब्यात घेवुन अटक केली आहे.
या आरोपींना न्यायालयाने दिनाक २८/०६/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मजुंर केली आहे. त्याच्याकडे पुढील तपास सपोनि दादाराजे पवार करीत आहेत..तपासाची हि कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रविण पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – ०३, सुहेल शर्मा सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस स्टेशन किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शबनम शेख यांच्या सुचना प्रमाणे तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक दादाराजे पवार, सहा पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, पोलीस उपनिरीक्षक माने, पोलीस अंमलदार तानाजी नांगरे, किरण देशमुख, विनोद शिंदे, हजारे, केंद्रे, किंद्रे गायकवाड, हुवाळे, तोडकर, पवार, पाडाळे, यांनी केली आहे.

