पुणे- कॅम्प परिसरातील आझम कॅम्पस जवळील पुना काॅलेज गेट परिसरातील रस्त्यावर एका टाेळक्याने हातात काेयते घेऊन ती हवेत फिरवत दहशत पसरवून ‘आम्ही इथले भाई आहे, आमच्या नादी लागू नका’ असे म्हणत तीन तरुणांवर जीवघेणा हल्ला करत त्यांना जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी अॅलेक्स गवळी व त्याच्या 10 ते 15 साथीदारांवर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अनिरुध्द अनिल जगताप (वय-25,रा.कॅम्प,पुणे) यांनी आराेपी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 19 जून राेजी रात्री सव्वाबारा ते साडेबारा वाजण्याचे दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पुणे कॅन्टान्मेंट येथे अतिक्रमण विभागात कामास आहे. साेमवारी रात्री तक्रारदार हे त्यांचा भाउ पंकज जगताप, मित्र साहिल व काैस्तुभ असे बाेलत थांबलेले हाेते. त्यावेळी पाच ते सहा दुचाकीवर त्याठिकाणी तक्रारदार यांचा ओळखीचा अॅलेक्स गवळी व त्याचे 10 ते 15 साथीदार त्याठिकाणी आले. त्यांनी पूर्ववैमनस्यातून तक्रारदार व त्यांचा भाऊ यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे दिशेने त्यांचे हातातील घातक हत्यारे घेऊन येऊन त्यांना गाडया आडव्या लावून पार्क करुन पाठलाग केला. आराेपी गवळी याने ‘यांना जिवंत साेडू नका’, ‘जिवे ठार मारुन टाका‘ असे म्हणत तक्रारदार यांचे डाेक्यात काेयत्याने मारुन गंभीर जखमी करत तक्रारदार यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचे तावडीतून तक्रारदार सुटका करुन पळून जात असताना, त्यांचे गळयातील साेन्याची चैन काेठेतरी पडून गहाळ झालेली आहे. तर त्यांचे चुलत भाऊ पंकज जगताप यांना देखील आराेपींनी हातावर, दंडावर, डाेक्यास काेयत्याने मारुन जखमी केले आहे. तसेच आराेपींनी त्यांचे हातातील हत्यारे फिरवत सदर परिसरात दहशत निर्माण केली. आम्ही इथले भाई आहे, आमचे नादी लागू नका असे म्हणत तेथून निघून गेले आहे. तक्रारदार यांचा मित्र साहिल याचे पाठीस व उजव्या पायावर देखील आराेपींनी काेणत्यातरी हत्याराने मारुन त्यांना जखमी केले आहे तर काैस्तुभ याचे पाेटात मारुन जखमी केले आहे. याबाबत पुढील तपास लष्कर पोलिस करत आहे.

