Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बनावट उत्पादनांपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी गोदरेज अॅग्रोव्हेटचे नवीन पॅकेजिंग सादर, डबलने २५ वर्षात २ कोटी शेतकरी कुटुंबांचे जीवन केले समृद्ध

Date:

पुणे: गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडच्या (जीएव्हीएल) क्रॉप प्रोटेक्शन बिझनेसनेभारतीय शेतकर्‍यांना अधिक चांगले उत्पादन काढण्यासाठी सक्षम करणाऱ्या डबल या आपल्याबायोस्टिम्युलंटला २५ वर्षे पूर्ण झाल्याची आज घोषणा केली. डबलने गेल्या २५ वर्षात २ कोटीशेतकरी कुटुंबांचे जीवन समृद्ध करत ३ कोटी एकर भारतीय शेतजमिनीवर याचा वापर केला आहे.कंपनीने डबलच्या २५ वर्षांचे स्मरण करणारा आणि शेतकऱ्यांना बनावट उत्पादनांपासून संरक्षणदेण्यासोबतच अधिक चांगल्या शेतीसाठीची बांधिलकी जपणारा सेलिब्रेटरी पॅक देखील सादर केला.
डबलचा नवीन पॅक वापरकर्त्याना वापरायला सुलभ आणि सुरक्षित पॅकेजिंग बाटलीमध्ये आहे. यात
कुणी भेसळ, बनावट करायचा प्रयत्न केल्यास लगेच कळेल असे टॅम्पर ईव्हीडंट सील आहे. त्यामुळे
जेव्हा कोणी बाटली उघडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ते सील फुटेल. बनावट भेसळ टाळण्यासाठी
लेबलमध्ये जटिल वॉटरमार्क आहेत आणि अस्सलतेची खात्री करण्यासाठी प्रत्येकन प्रत्येक बाटलीवर
एक विशिष्ट ९ अंकी कोड असलेला होलोग्राम आहे. उत्पादन अस्सल आहे याची ग्राहकाला खात्री
देण्यासाठी होलोग्राममध्ये व्यवस्थितपणे एम्बेड केलेले अक्षर ‘जी’ असून दृष्टीदोष असलेल्यांसाठी
धोक्याची सूचना देणारे मार्किंग ‘ब्रेल’ मध्ये आहे.

डबल हे एक बायोस्टिम्युलंट, कापूस, सोयाबीन, भुईमूग आणि भाजीपाला (टोमॅटो) पिकांमध्ये फुलं
आणि फळांची गळती कमी करते. फुलं आणि फळे गळून पडणे यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर
१५%-२५% परिणाम होतो. डबलच्या योग्य डोससह बरोबर शेती पद्धती शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन
वाढविण्यात मदत करू शकते. कापसात, डबल चांगले फलन करण्यास मदत करते, त्यामुळे चांगले
बियाणे सेटिंग (बीज निर्मितीच्या प्रक्रियेतील मुख्य विकासाचा टप्पा) आणि मजबूत शेंगा (एक
गोलाकार परिपक्व फळ) असा पाया तयार होतो. सरासरी, १८%-२०% उत्पन्न वाढविण्यात डबलच्या
दोन अॅप्लीकेशनची मदत होते. सोयाबीन आणि भुईमूग पिकांवर अशाच प्रकारे डबलचा वापर
केल्याने पिकाला खतनिर्मिती अडथळ्यांवर मात करण्यास मदत होते, फुलांची गळती कमी होते
आणि शेंगा सेटिंग सुधारल्यामुळे परिणामी उत्पादनात अनुक्रमे ३०%-३५% आणि १०%-१२% वाढ
होते. टोमॅटोसाठी, परागकणांची व्यवहार्यता सुधारण्यात आणि फुल-ते-फळ रूपांतरण सुधारण्यात
मदत मिळते. त्यामुळे फुलांची गळती कमी होते आणि प्रति झाड जास्त फळे, एकसमान आकार,
रंग आणि पिकावर अवलंबून फळांचे वजन १५%-१८%ने वाढते.
डबलला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बोलताना जीएव्हीएलचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह
यादव म्हणाले, “शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे उत्पादन वाढवण्यास मदत करण्याच्या उद्देशाने डबल
सादर करण्यात आले. सुरुवातीपासूनच आम्ही २ कोटी भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनाला स्पर्श केला
असून उत्पादनात सरासरी १८% वाढ झाली आहे आणि त्यामुळे आपल्या भारतीय शेतकर्‍यांचे
उत्पन्नही वाढले आहे. आम्हाला खात्री आहे की डबल सारखे उत्पादन, योग्य प्रमाणात आणि योग्य
वेळेत वापरले तर आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेची खात्री बाळगताना शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन
आणि उत्पन्न वाढवण्यास मदत होईल.”
जीएव्हीएलने १९९२ मध्ये डबलसाठी कच्चा माल असलेल्या होमोब्रासइनऑलीड (एचबीआर) वर
मोठ्या प्रमाणावर काम करण्यास सुरुवात केली. पिकांमधील पेशी विभाजन आणि पेशी वाढ सुधारणा
यातील त्यांची भूमिका पाहून, कंपनीने १९९८ मध्ये डबल सादर केले. त्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा
फायदा घेता आला. फुलांची गळती आणि फळांची गळती कमी करण्याव्यतिरिक्त, डबल सारखे
बायोस्टिम्युलंट पिकाची जैविक आणि अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासही मदत
करते.
अजैविक ताणामध्ये तापमान, अतिनील किरणोत्सर्ग, क्षारता, पूर, दुष्काळ इत्यादींचा समावेश होतो,
ज्यामुळे पिकांवर परिणाम होतो तर जैविक ताण म्हणजे कीटक, शाकाहारी प्राणी, बुरशी, जीवाणू
किंवा तण यांच्यामुळे होणारे नुकसान.
बायोस्टिम्युलंट्सचे महत्त्व अधोरेखित करताना जीएव्हीएलचे कार्यकारी संचालक बुर्जिस गोदरेज
म्हणाले, “जागतिक स्तरावर उत्पादनातील ७०% तफावत हवामान बदलामुळे 1 ठरते.

भारतातही वाढणारे तापमान आणि अनियमित पर्जन्यमान यांचा पीक उत्पादनावर परिणाम होत आहे आणि
तण आणि कीटकांच्या वाढीस अनुकूलता मिळत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत बायोस्टिम्युलंट
पिकांचे उत्पादन वाढवण्यास मदत करतात. जागतिक आणि भारतीय बायोस्टिम्युलंट बाजारपेठ
२०३१ पर्यंत अनुक्रमे ११.८% आणि १२.५% च्या सीएजीआरने वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच
एचबीआरचे जगातील सर्वात मोठे उत्पादक म्हणून आम्ही जीएव्हीएल येथे भारतीय शेतकर्‍यांना
त्यांच्या पिकाच्या गरजेनुसार वेगवेगळी बायोस्टिम्युलंट्स देऊन सेवा देत राहू.”
बायोस्टिम्युलंट्ससाठी स्वतंत्र नियम परिभाषित करणाऱ्या जगभरातील काही मोजक्या देशांपैकी
भारत एक आहे. १,६४० कोटी रुपयांच्या असंघटित जैवरासायनिक क्षेत्रासह सर्वात वेगाने वाढणाऱ्या
उपक्षेत्रांपैकी एक असल्याने, २०२१ मध्ये जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे उत्पादकांना रासायनिक रचना
आणि कालबाह्यता तारीख, तसेच सरकारकडे 2 अगोदर नोंदणी अनिवार्य करण्यासाठी उत्पादनांना
लेबल करणे अनिवार्य करते.
नियमनाच्या महत्त्वावर भाष्य करताना जीएव्हीएलच्या पीक संरक्षण व्यवसायाचे मुख्य कार्यकारी
अधिकारी राजवेलू एन.के. म्हणाले, “शेतकरी त्यांच्या पिकातून जास्तीत जास्त उत्पादन
मिळवण्याच्या आशेने पीक संरक्षण उत्पादनात गुंतवणूक करत असतो. ८५% भारतीय शेतकरी लहान
आणि अल्पभूधारक असल्याने, त्यांना अस्सल आणि वापरण्यास सोपे असलेले एक दर्जेदार उत्पादन
प्रदान करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे, नियमन स्थापित करणे ही पहिली पायरी असताना,
शेतकर्‍यांना योग्य आणि शिफारस केलेल्या प्रमाणात अस्सल उत्पादनाच्या वापरातून होणाऱ्या
फायद्यांबद्दल शिक्षित करून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उद्योग-व्यापी
सहकार्याची गरज आहे.”
डबलचे नवीन पॅकेजिंग सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि वापरण्यास सोयीस्कर
आहे.
२०२१ मध्ये हवामानाच्या संकटामुळे भारतातील ५ दशलक्ष हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. कीड
आणि रोग तसेच खराब कृषी पद्धतीमुळेही उत्पादनावर परिणाम होत असताना उद्योगांनी योग्य
उत्पादनाचा योग्य वेळी वापर करणे, व्यवस्थित फवारणी करणे आणि एकात्मिक कीड
व्यवस्थापनासह बायोस्टिम्युलंट्सचे महत्त्व सांगत पीक संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे ही
काळाची गरज आहे असे जीएव्हीएलचे मत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...